टीमसीचे माजी नेते दिनेश त्रिवेदींचा भाजप प्रवेश

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

दिनेश त्रिवेदी यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे,भाजपचे राष्ट्रीय़ अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीयमंत्री पियूष गोयल यावेळी उपस्थित होते.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तृणमुल कॉंग्रेसचे माजी नेते आणि खासदार दिनेश त्रिवेदी यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय़ अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीयमंत्री पियूष गोयल यावेळी उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश करताना दिनेश त्रिवेदी यांनी तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्य़ावर जोरदार हल्ला केला. तसेच यावेळी त्यांनी म्हटले की, मी निवडणूक लढवली किंव नाही लढवली तरी मी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय राहील.

''पश्चिम बंगालच्या जनतेनं तृणमुल कॉंग्रेसला नाकारलं आहे. बंगालच्या जनतेला आता फक्त विकास हवा आहे. भ्रष्टाचार आणि हिंसा बंगालच्या जनतेला नको आहे. राजकारण हा फक्त एक खेळ नाही, गंभीर विषय आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या आदर्शांना विसरल्या आहेत,''असही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. 

पुढे म्हणाले, ''मी जे करतो ते अगदी मनापासून करतो. मी आधी ठरवलेलं नव्हतं. भावनिकपणे नातं निर्माण झालेल्या पक्षांमधून बाहेर पडताना तुम्हाला ठोस कारण हवं असत. असं टीमसी नेते त्रिवेदी यांनी यापूर्वी म्हटले होते. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यवर हल्ला झाल्यानंतर मी निषेध केला होता. त्यानंतर माजा निषेध करण्यात आला. बंगालमद्ये हिंसाचाराल कोणतीच जागा नाही. बंगाल हा शांतताप्रिय आहे. मग हे डोकं इतर गोष्टींमध्ये कशाला वापरायचं मला वाटत बंगालनेच हे उत्तर शोधलं पाहिजे,'' अस देखील मत त्रिवेदी यांनी व्यत्क केलं.

 

संबंधित बातम्या