माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश
Former Union Minister Yashwant Sinha joins Trinamool Congress

कोलकाता:आगामी काळात पाच राज्यांमध्ये पुढील महिन्याभरात निवडणूका होणार आहेत. मात्र मोठ्या राजकीय घडामोडी या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक होताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये बंगालमध्ये स्टार कॅम्पनर्सची यादी तृणमुल कॉंग्रेस, मग भाजप आणि नंतर कॉंग्रेस यांनी जाहीर करुन पुढील महिन्याभरात प्रचाराचा रणसंग्राम कसा असणार याची झलक दाखवून दिली. आता पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड झाली आहे. एकेकाळी भाजपमधील कोअर कमिटीमध्ये राहिलेला आणि जेष्ठ राजकीय नेते यशवंत सिन्हा यांनी तृणमुल कॉंग्रेसमध्य़े प्रवेश केला आहे. त्यामुळे यामागे तृणमुल पक्षाची कोणती राजकीय चाल आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगली रंगली आहे.

यशवंत सिन्हा यांचा भाजपच्या थिंक टॅंकमध्ये  समावेश होता. मात्र भाजप अंतर्गत निर्माण झालेल्या मतभेदामुळे यशवंत सिन्हा यांनी 2018 मधून भाजपमधून बाहेर पडले होते. परंतु त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे अजूनही भाजपमध्ये कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये  जयंत सिन्हा हवाई वाहतूक मंत्री राज्यमंत्री होते.

यशवंत सिन्हा यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर राजकीय जीवनावासून विलग झाले होते. मात्र पश्चिम बंगालच्या निवडणूका महिन्यावर आल्या असतानाच तृणमुल कॉंग्रेसमध्ये सिन्हा यांनी प्रवेश केला आहे. तसेच तृणमुल कॉंग्रेसमधून अनेक जेष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळेच निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या तृणमुल कॉंग्रेसला यशवंत सिन्हा यांच्या पक्षप्रवेशामुळे कितपत फायदा होणार यासंबंधी तर्क वितर्क लढवले जात आहेत.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com