दहशतवादी चकमकीत चार जवान शहिद ; तीन दहशतवादी ठार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, तर एक कॅप्टन आणि तीन जवान हुतात्मा झाले.

श्रीनगर : कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, तर एक कॅप्टन आणि तीन जवान हुतात्मा झाले. यात सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचा समावेश आहे. पहाटे सुरू झालेली चकमक रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे एकच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाला ताबा रेषेपासून तीन किलोमीटर अंतरावर काही दशतवादी घुसखोरीच्या प्रयत्न करत असल्याचे जवानांना दिसून आले. त्यावेळी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तसेच सुरक्षादलाचे कॉन्स्टेबल सुदीप सरकार हुतात्मा झाले.

संबंधित बातम्या