West Bengal Election 2021: मतदान केंद्राबाहेरच्या गोळीबारात 4 जण ठार; नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

दैनिक गोमंतक
शनिवार, 10 एप्रिल 2021

आनंद बर्मन नावाच्या युवकाला सितलकुचीच्या पठाणतुली भागात असलेल्या  बुथ क्रमांक 85 वर मतदान सुरु असताना बाहेर खेचत आणले गेले आणि त्या युवकाला गोळी घालून ठार करण्यात आले.

पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरु असून, नेहमी प्रमाणे या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आज पश्चिम बंगालच्या कूच बिहार भागात मतदान केंद्रावर मतदान सुरु असताना काही लोकांनी एका युवकाला मतदान केंद्राबाहेर ओढत आणून गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच या नंतर मोठा हिंसाचार देखील झाला असल्याचे समजते आहे.  ( Four killed in firing outside polling station in Koch Bihar West Bengal)

West Bengal Election: पहिल्यांदाच मतदानासाठी गेलेल्या तरुणाची गोळी घालून हत्या 

आनंद बर्मन नावाच्या युवकाला सितलकुचीच्या पठाणतुली भागात असलेल्या  बुथ क्रमांक 85 वर मतदान सुरु असताना बाहेर खेचत आणले गेले आणि त्या युवकाला गोळी घालून ठार करण्यात आले. यानंतर मतदान केंद्राबाहेर झालेल्या मोठ्या गोंधळात बॉम्ब देखील फेकले गेले आणि त्यात 4  लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले असल्याचे समजते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलिगुडीमध्ये प्रचार सभेला संबोधित करत असताना या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. "कूचबिहारमध्ये जे घडले ते अतिशय दुःखद असून, मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. भाजपच्या बाजूने जनतेचा पाठिंबा पाहून दीदी व त्यांच्या गुंडांचा राग अनावर होत आहे" असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले आहे. 

"आपली  खुर्ची जात असल्याचे पाहून दीदी या पातळीवर आल्या आहेत, मात्र आपल्याला दीदी आणि त्यांच्या गुंडाना सांगायचे आहे की, तृणमूल काँग्रेसची ही मनमानी चालू दिली जाणार नाही.'' असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच पुढे त्यांनी निवडणूक आयोगाला कूचबिहारमध्ये घडलेल्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती देखील केली आहे.  

संबंधित बातम्या