ममता सरकारला पुन्हा हादरे बसण्याची शक्यता; चार मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला चार कॅबिनेट मंत्र्यांची दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोलकता- पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला चार कॅबिनेट मंत्र्यांची दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे काही मंत्री भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार हे आता स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केले आहे. 

राजीव बॅनर्जी, रवींद्रनाथ घोष, गौतम देव आणि चंद्रनाथ सिन्हा हे मंत्री बैठकीला अनुपस्थित होते. या चौघांकडे खुलासा मागण्यात आला होता. तीन मंत्र्यांनी आपल्या अनुपस्थितीची कारणे कळविल्याचे कळते.  

संबंधित बातम्या