“Fraud-To-Phone” चा भांडाफोड; 300 मोबाईल जप्त, आठ जणांना अटक

“Fraud-To-Phone” चा भांडाफोड; 300 मोबाईल जप्त, आठ जणांना अटक
MOBILE.jpg

फ्रॉड टू फोन (Fraud-To-Phone) नेटवर्कचा पर्दाफाश करत सुरक्षा एजन्सीने (security agency) आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 300 नवे मोबाईल (Mobile) जप्त केले आहेत. जे त्यांनी चोरी केलेल्या पैशांनी खरेदी केले होते. मंगळवारी यासंबंधीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनेक राज्यांमध्ये ही टोळी पसरली होती.

याशिवाय 900 मोबाईल, 1000 बॅंक खाती आणि शेकडो युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified payment interface) आणि ई कॉमर्स आयडीचीही (ECommerce ID) ओळख या टोळीकडून पटवून घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्तापर्यंत सुरक्षा संस्थानी सुमारे 100 बॅंक खाती आणि क्रेडिट तसेच डेबिट कार्डचे व्यवहार रोखले आहेत.

सुरक्षा अधिकाऱ्यांनीअटक केलेल्या आरोपींमध्ये झारखंडमधील(Jharkhand) चार आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) आणि मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) प्रत्येकी दोन जण आहेत, अशी गृहमंत्रालयाकडून माहिती दिली आहे. या टोळीविरुध्द 18 राज्यांमध्ये मोहीम चालवण्यात आली. यात 350 लोकांचा सहभाग होता. एफसीओआरडी, केंद्रीय गृह मंत्रालय मध्यप्रदेश पोलिस आणि इतर काही राज्यांच्या पोलिस दलांनी एका विशिष्ट माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापुढे अधिकाऱ्याने सांगितले, राजस्थानमधील उदयपूर (Udaipur) येथे राहणाऱ्या एका 78 वर्षीय वृध्दाने 11 जून रोजी गृह मंत्रालयाकडून (Ministry of Home Affairs) चालवलेल्या सायबरसेफ अ‍ॅपवर ६.५० लाख रुपयांच्या सायबर फसवणूकीची तक्रार दिली होती. पोलिसांना तपासादरम्यान, असे दिसून आले की, एसबीआय कार्डमध्ये हे पैसे थेट जमा झाले होते, जे प्लिपकार्डवरुन शाओमी पोको एम मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले होते. त्यानंतर काही क्षणातच हे मोबाईल फोन मध्यरप्रदेशमधील कोणत्या पत्त्यावर मागविण्यात आले हे शोधण्यात आले. अशी माहिती बालाघाट पोलिस अधिक्षकांनी (Balaghat Police) दिली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com