कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी 'रिक्षालाच' बनवली मोफत रुग्णवाहिका!

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

गेल्या 18 वर्षापासून मी भोपाळमध्ये रिक्षा चालवत आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या वर्षीपासून कोरोना ठाण मांडून बसला आहे. या काळामध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असताना अनेक माणुसकी जिवंत करणाऱ्या घटना सुध्दा समाजासमोर येत आहेत. अशातच भोपाळमध्ये गेल्या 18 वर्षापासून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करणारे जावेद खान (Javed Khan) हे अडचणीत सापडलेल्या कोरोना रुग्णांसाठी देवदूत म्हणून पुढे आले आहेत. कोरोना रुग्णांसाठी वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे किंवा रुग्णवाहिकेत ऑक्सिजन (Oxygen) नसल्यामुळे कोरोना रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची परवड होत असल्याची असंख्य प्रकरणं देशात घडत आहेत. अनेकदा कोरोना रुग्णांना मिळेल त्या वाहनातून रुग्णालयात नेण्याची वेळ ओढावते. अशाच घटना मन हेलावलेल्या 34 वर्षीय जावेद खान यांनी स्वत:ची रिक्षाच प्राणवायूच्या वाहिकेत रुपांतरीत केली. आणि या ‘रुग्णवाहिकेतून’ ते कोरोना रुग्णांना मोफत सेवा देतात. (Free ambulance made to serve Corona patients)

डॉक्टरांना शिव्या-शाप देण्यापूर्वी घामाने थिजलेल्या 'या' कोरोना...

जावेद खान सांगतात, ‘’गेल्या 18 वर्षापासून मी भोपाळमध्ये (Bhopal) रिक्षा चालवत आहे. खरतर माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झालेली नाही. परंतु कोरोनामुळे होणारे मृत्यू पाहून माझं मन पुरतं हेलावून गेलं होतं. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून मला यावर काहीतरी करण्याची इच्छा प्रकट झाली होती. मला माझ्या कुटुंबियांनी रिक्षालाच रुग्णवाहिकेत रुपांतरीत करण्याचा सल्ला दिला. मी रिक्षामध्ये सॅनिटायझर ठेवलं आहे, काही औषधं ठेवली आहेत, एक ऑक्सिजन सिलेंडर सुध्दा ठेवलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहचवलं आहे,’’ अशी करुणता सागंताना जावेद खान यांच्या डोळ्यांमध्य़े पाणी आलं होतं.

''ही सगळ्यांपेक्षा वेगळी अशी रुग्णवाहिका बनवण्यासाठी माझ्या पत्नीने स्वत:हून सोन्याचं लॉकेट दिलं होतं. ‘’रोज 600 रुपयांचा ऑक्सिजन सिलेंडर भरावा लागतो. ऑक्सिजन रिलिफ करणं हे खूप कठीण असतं. त्यामुळे मला रोज 4 ते 5 तास रांगेत थांबावं लागतं.’’ असं जावेद खान सांनी सांगितलं. जेणेकरुन त्यांना कोरोना रुग्णांवर लक्ष केंद्रीय करता येईल. सोशल मिडियाच्या माध्यमातूनही आपण करत असलेल्या कामाविषयी माहिती दिली आहे. लोक त्यांना फोन करत त्यांची सेवा घेतात. विशेष म्हणजे या सेवेसाठी जावेद खान एक रुपायाही घेत नाहीत.
 

संबंधित बातम्या