जेष्ठ नागरिकांना 1 मार्चपासून मोफत कोरोना लस 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

1 मार्चपासून जेष्ठ नागरिकांना कोरोनाची मोफत लस देण्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

नवी दिल्ली: देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता 1 मार्चपासून जेष्ठ नागरिकांना कोरोनाची मोफत लस देण्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत, ''1 मार्चपासून 60 वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसेच इतर व्याधींनी ग्रस्त असणारे 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार आहे'', असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

ते पुढेही म्हणाले, ''10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रावर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच ही लस मोफत देण्यात येणार आहे. या लसीकरणाच्या मोहिमेचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. मात्र ज्यांना खासगी रुग्णालयामधून लसीकरण करुन घ्यायचे आहे, त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. खासगी रुग्णालयातून लसीकरण करण्यासाठी किती पौसे द्यावे लागणार हे पुढच्या तीन ते चार दिवसात आरोग्य मंत्रालय सांगणार आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची रुग्णालये आणि लसनिर्मीती करणाऱ्या कंपन्यासोबत चर्चा सुरु,''असल्याचे यावेळी जावडेकरांनी सांगितले.

UPSC CSE: उमेदवारांना नाही मिळणार अतिरिक्त संधी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली...

पीटीआयच्या वृत्तानुसार, ज्या राज्य़ांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे,त्या राज्यांमध्ये केंद्र सरकार तीन सदस्यीय आरोग्य पथक पाठवणार आहे. या राज्य़ामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्राबरोबर पंजाब, केरळ, जम्मू- काश्मीर, कर्नाटक या राज्यांचाही समावेश आहे. या पथकाचा मुख्य उद्देश हा कोरोनाशी लढण्यासाठी त्या राज्य़ांना मदत करणे असणार आहे. तसेच या पथकाचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव अधिकारी करणार आहे.

 

संबंधित बातम्या