मित्राचा सल्ला जीवावर बेतला; कोरोनाच्या भितीने रॉकेल प्यायला

A friends advice is worth it Corona drank kerosene in fear
A friends advice is worth it Corona drank kerosene in fear

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना एकीकडे कोरोनामुळे रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यू होणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. काही जणांनी कोरोनाची इतकी धास्ती घेतली की,आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचललं जात आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमध्येही (Bhopal) असाच एक प्रकार घडला आहे. कोरोनाच्या धास्तीने मित्राचा सल्ला ऐकला आणि रॉकेल प्यायला. मात्र हा उपाय त्याला चांगलाच महागात पडला आहे. (A friends advice is worth it Corona drank kerosene in fear)

भोपाळमधल्या अशोक गार्डन भागात मृत महेंद्र हा टेलरिंगचं काम करायचा. काही दिवसांपूर्वीच त्याला ताप आला होता. त्यामुळे आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची भिती त्याच्या मनामध्ये घर करुन बसली होती. त्याला सतत वाटत होतं की आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णलयातील कोरोनाची परिस्थिती पाहता त्याने चांगलाच धस्का घेतला होता आणि याबाबत आपल्या मित्राला कल्पना दिली होती. मित्राने कोरोनातून बरा होण्यासाठी त्याला एकदम जालीम उपाय सांगितला. मात्र मित्राचा हा उपाय त्याच्यावर चांगलाच बेतला आहे. मित्राने त्याला रॉकेलचं प्रशान केल्यानंतर कोरोना बरा होतो असं सांगितलं.

मृत महेंद्रने हा जालीम सल्ला इतका मनावर घेतला की, त्याने तात्काळ रॉकेल प्यायला. मात्र नियतीच्या मनात वेगळचं काहीतरी लिहलं होतं. रॉकेल प्यायल्याने त्याची प्रकृती चांगलीच खलावली. त्याने कुटुबिंयाना सुरुवातीस सांगितलचं नाही. त्याला भोपाळमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र अखेर रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्याला तिथेच मृत घोषीत करण्यात आले. रुग्णालयात महेंद्रला दाखल करण्यात आल्यानंतर त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्याची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्याच्या कुटुबिंयाना आणखीणच मोठा धक्का बसला. मनात शंका असताना कोरोना चाचणी केली असती तर हा प्रकार घडला नसता असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com