''घाबरट बॉलिवूड सेलिब्रिटींनो, कुठायं तुमचा...?''

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 एप्रिल 2021

बॉलिवूड सेलिब्रिटींनी मौन धारण केल्यानंतर राजदचे नेते तेजस्वी यादव चांगलेच भडकले आहेत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज लाखांच्या घरात नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्र, (Maharashtra) दिल्लीसह (Delhi) अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचा प्राणवायू अभावी तडफडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भारतातील चिंताजनक परिस्थितीवर देश विदेशातून चिंता व्यक्त करण्याबरोबरच केंद्र सरकारवरही टीकाही होत आहेत. यावर मात्र बॉलिवूड सेलिब्रिटींनी मौन धारण केल्यानंतर राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) चांगलेच भडकले आहेत. भित्र्या बॉलिवूड सेलिब्रिटींनो,(Bollywood Celebrity) असा उल्लेख करत त्यांनी फटकारलं आहे.

’व्यवस्था फेल, जन की बात करणं महत्त्वाचं’’

विदेशातून भारतातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. विविध सेलिब्रिटींनी तसेच अनेक नेत्यांनी याबद्दल मते मांडली आहेत. याचाच संदर्भ देत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मौनावर आपला संताप व्यक्त केला आहे. ‘’प्रिय भारतीय सेलिब्रिटींनो थोडा तरी कणा दाखवा, थोडं तरी या बोला. तुमच्यासाठी अत्यंत प्रिय असणाऱ्या व्यक्तीच्या चुकीच्या प्राथमिकतांमुळे प्राणवायूसारख्या मूलभूत गोष्टींसाठी तुमचे बांधव एक दुसऱ्यांच्या जीवासांठी प्रत्येक सेंकदाला मरत आहेत. तुमचा विवेक कुठे आहे. कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा आणि ह्रदय? देशाशी प्रामाणिकता दाखवा सरकारशी नाही,’’ असं म्हणत राजद नेते तेजस्वी यादव यांनी भारतीय सेलिब्रिटींवर संताप व्यक्त केला आहे.

‘’कृषी कायद्याच्या (Farm Bill) विरोधात जेव्हा जगभरातील नागरिकांनी असंवेदनशील सरकारवर टीका केली, तेव्हा या कलाकारांनी देशातील अंतर्गत मुद्दा आहे म्हणत नकली नाराजी दाखवली होती. आताही त्यांची निवडक राजकीय नाराजी कुठे गेली? सगळीकडे भारतीय लोक मरत आहेत. प्रत्येक क्षणाक्षणाला भारतीयांचा मृत्यू होत आहे. परंतु या पोकळ आदर्शांना थोडाही त्रास होत नाही,’’ अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी भारतीय सेलिब्रिटींना फटकारलं.
 

संबंधित बातम्या