असंतुष्ट नेत्यांना कानपिचक्या

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

अपेक्षेनुसार काँग्रेस कार्यकारिणीत संमत करण्यात आलेल्या ठरावात पक्षांतर्गत बाबी या पक्षाच्या व्यासपीठांवरच उपस्थित करण्यात याव्यात, अशा कानपिचक्‍या असंतुष्ट कॉँग्रेसनेत्यांना देण्यात आल्या. तसेच सोनिया व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्‍वासही व्यक्त करण्यात आला. 

नवी दिल्ली: अपेक्षेनुसार काँग्रेस कार्यकारिणीत संमत करण्यात आलेल्या ठरावात पक्षांतर्गत बाबी या पक्षाच्या व्यासपीठांवरच उपस्थित करण्यात याव्यात, अशा कानपिचक्‍या असंतुष्ट कॉँग्रेसनेत्यांना देण्यात आल्या. तसेच सोनिया व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्‍वासही व्यक्त करण्यात आला. 

पक्षापुढील आव्हाने लक्षात घेऊन आवश्‍यक ते संघटनात्मक बदल करण्याचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनाची प्रक्रियाही सुरू करण्याचे ठरविण्यात आले. सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस पक्षाचा व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सोनिया व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्‍वास असल्याचे सांगून आतापर्यंत वर्तमान सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात राहुल आणि सोनिया गांधी यांनी ‘बुलंदपणे’ आवाज उठवून सरकारला धारेवर धरल्याचे व त्याची दखल सर्वत्र घेण्यात आल्याचे म्हटले. तेवीस असंतुष्ट नेत्यांनी त्यांच्या पत्रात उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत कार्यकारिणीत विचारविनिमय करण्यात आला असे पक्षाने मान्य केले. 

संबंधित बातम्या