काँग्रेसचे खासदार राजीव सातव अनंतात विलीन 

दैनिक गोमंतक
सोमवार, 17 मे 2021

काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Rajeev Satav)यांचे काल (ता. 16) पुण्यात निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी म्हणजे हिंगोलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Rajeev Satav)यांचे काल (ता. 16) पुण्यात निधन झाले. कोविड-19 (Covid-19)चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते.  कोविड-19 मधून  ते बरेही झाले होते. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि काल सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.  आज त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी म्हणजे हिंगोलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील अनेक लोकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.  (Funeral of Congress MP Rajeev Satav) 

Gujarat Earthquake: गुजरातवर दुहेरी संकट; वादळासोबतच भुकंपाचे धक्के

कॉंग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील राजीव सातव यांच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे. '' मी माझा मित्र राजीव सातव यांना गमावल्याने मला फार दुख होत आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारे नेते होते. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांचे एक मोठे नुकसान झाले आहे.'' असे म्हणत राहुल गांधी यांनी दुख व्यक्त केले आहे. तर कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीदेखील राजीव सातव यांच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे. '' आज मी माझ्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याला गमावले आहे. ज्याने मजहयासोबत युवा कॉंग्रेसमध्ये माझ्यासोबत  पहिले पाऊल टाकले आणि तो प्रवास आजपर्यंत सुरू होता. पण आज..  राजीव सातव  याचा साधेपणा, निखळ हास्य,  जमिनीशी असलेले नाते,  त्यांचे नेतृत्व, पक्षाशी असलेली एकनिष्ठता आणि त्यांची मैत्री नेहमीच आठवणीत राहील असे, सुरजेवाला यांनी म्हटल आहे.  तर,  खा. राजीव सातव यांना महाराष्ट्राचे  काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहीली आहे. '' राजीव सातव यांचे निधन म्हणजे नियतीने एका प्रतिभाशाली, उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतल्यासारख आहे.  काँग्रेस पक्षासाठी ही  मोठी हानी आहे, असे मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटल आहे.   

मध्यप्रदेशातील गाव झाले कोरोनमुक्त, काय आहे त्यांचा अनोखा फॉर्मुला; जाणून घ्या

कोण होते राजीव सातव? 
राजीव सातव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (Indian National Congress) पक्षातील राजकारणी होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातिल हिंगोली मतदारसंघातून ते बहुमताने विजयी झाले.  मोदी लाटेत त्यांनीहिंगोली मतदारसंघातिल शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत करत बहुमताने विजय मिळवला.  विशेष म्हणजे राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही राजीव सातव ओळखले जायचे. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सातव यांच्याकडे  गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी होती.  या निवडणुकीत  सातव यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने चांगलं यश मिळालं.  राजीव सातव  सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी होते.  मात्र त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली.  कॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची आणि युथ कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे  देण्यात आली होती. 

संबंधित बातम्या