
Rishi Sunak On Khalistan: भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 शिखर परिषद होत आहे. यासाठी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनकही भारतात पोहोचले आहेत.
भारतात पोहोचल्यानंतर पंतप्रधान सुनक यांनी खलिस्तान, हिंदू धर्म, रशिया-युक्रेन युद्ध आणि पंतप्रधान मोदींसोबतच्या संबंधावर भाष्य केले. सुनक म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मला दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक आणि महत्त्वाकांक्षी व्यापार करार झालेला पाहायचा आहे.
व्यापार सौद्यांना नेहमीच वेळ लागतो, त्यासाठी दोन्ही देशांनी काम करणे आवश्यक आहे. आपण खूप प्रगती केली असली तरी अजून खूप मेहनत करायची आहे.
खलिस्तानच्या मुद्द्यावर ऋषी सुनक म्हणाले की, हा खरोखर एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, युनायटेड किंगडममध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार स्वीकार्य नाही.
यासाठी आम्ही भारत सरकारसोबत जवळून काम करत आहोत, विशेषत: 'PKE' खलिस्तान समर्थक अतिरेक्यांना तोंड देण्यासाठी.
सुनक पुढे म्हणाले की, मला ते योग्य वाटत नाही. आमच्या संरक्षण मंत्र्यांनी नुकतेच भारतातील (India) त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली. आमच्याकडे माहितीचे देवाणघेवाण करण्यासाठी काम करणारे अनेक गट आहेत, जेणेकरुन अशा प्रकारच्या हिंसक लोकांना उखडून टाकण्यासाठी मदत होईल. हे योग्य नाही आणि मी यूकेमध्ये ते सहनही करणार नाही.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हिंदू (Hindu) धर्माशी असलेल्या त्यांच्या संबंधाबाबत सांगितले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. आशा आहे की, पुढचे काही दिवस मी इथे असेन तेव्हा मंदिरांना भेट देईन.
रक्षाबंधनचा सण नुकताच पार पडला, बहिणींनी बांधलेल्या राख्या माझ्याकडे अजूनही आहेत. तथापि, जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मला वेळ मिळाला नाही. पण आशा आहे की, मी मंदिरात जावून त्याची भरपाई करेन. ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे.
पीएम मोदींसोबतच्या संबंधांबद्दल युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, मला पीएम मोदींबद्दल खूप आदर आहे.
भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक करार पूर्ण करण्याच्या सामायिक महत्त्वाकांक्षेवर आम्ही खूप मेहनत घेत आहोत, कारण आम्हा दोघांनाही वाटते की ही एक चांगली गोष्ट आहे.
त्याचबरोबर, आम्हा दोघांनाही ते पूर्ण होतील याची खात्री करावी लागेल. G20 हे भारतासाठी मोठे यश आहे.
रशिया आणि युक्रेनबाबत भारताच्या भूमिकेबाबत सुनक म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर काय भूमिका घ्यावी हे सांगणे हे माझे काम नाही, परंतु मला माहित आहे की भारत आंतरराष्ट्रीय कायद्याचे, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे पालन करतो. त्याचबरोबर क्षेत्रीय अखंडतेचा आदर करतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.