'बंदूक आणि स्फोटकांची ऑटो प्रगती मैदानाकडे जातेय' G20 च्या पार्श्वभूमीवर एका ट्विटमुळे दिल्ली पोलिसांची धावपळ

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता भलतीच गोष्ट समोर आली.
G20 Summit New Delhi 2023
G20 Summit New Delhi 2023

G20 Summit New Delhi 2023: एक ऑटो बंदूक आणि स्फोटके घेऊन प्रगती मैदानाकडे जात असल्याचे ट्विट डीसीपींना टॅग करुन एका व्यक्तीने केले. या ट्विटमुळे दिल्लीत एकच खळबळ निर्माण झाली आणि पोलिसांची पुरती धावपळ झाली.

ट्विटमध्ये ऑटो नंबर देखील लिहिला होता. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता भलतीच गोष्ट समोर आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

कुलदीप शाह असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शाहने डीसीपी आऊटर नॉर्थला ऑटो नंबरसह टॅग करत, एक ऑटो गन आणि स्फोटके घेऊन प्रगती मैदानाकडे जात आहे. असे ट्विट केले. प्रगती मैदानावर G20 शिखर परिषद सुरू असल्याने. त्यामुळे या ट्विटनंतर पोलीस तातडीने अॅक्शनमोडमध्ये आले.

या ट्विटच्या आधारे दिल्ली पोलिसांनी कारवाई करत ट्विटमध्ये ज्या ऑटोचा क्रमांक नमूद केला होता त्याचा शोध घेतला. पोलिसांनी काही वेळातच ऑटो शोधून काढली आणि ऑटो मालकाच्या घरी पोहोचले. पोलिस तेथे पोहोचले असता त्यांना ऑटो घरी उभा असल्याचे दिसले.

G20 Summit New Delhi 2023
दिगंबर कामत यांच्‍या नाकर्तेपणामुळे आर्थिक राजधानी मडगावची वाट लागली; सरदेसाई म्हणाले आता पर्याय...

अधिक तपासादरम्यान ऑटोचालक कपड्यांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांना समजले. वैयक्तिक वैमनस्यातून ऑटो मालकाला गोवण्याच्या उद्देशाने असे ट्विट जाणीवपूर्वक करण्यात आले होते. तसेच, वाहन मालक आणि आरोपींमध्ये पार्किंगवरून वाद झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.

वैयक्तिक वैमनस्यामुळे आरोपी कुलदीपने दिल्ली पोलिसांना चुकीची माहिती पाठवली, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. आणि त्याने G20 शी संबंधित चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे आरोपी कुलदीपवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com