G20 Summit 2022: आज G20 शिखर परिषदेचा दुसरा दिवस, PM मोदींची ब्रिटन, जर्मनीसह 8 देशांसोबत द्विपक्षीय बैठक, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

G20 Summit 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8 देशातील नेत्यांशी या विषयांवर चर्चा करु शकतात.
G20 Summit 2022 | PM Modi
G20 Summit 2022 | PM ModiDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या G-20 शिखर परिषदेदरम्यान आज 8 देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, स्पेन, फ्रान्स, सिंगापूर, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंगडमच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. या देशांसोबत पीएम मोदींची द्विपक्षीय बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामध्ये या देशांसोबत द्विपक्षीय करारावर सहमती होण्याची शक्यता आहे. 

  • चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली

G-20 शिखर परिषदेदरम्यान आयोजित डिनर टेबलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक आणि चर्चा झाली. भारतीय शिबिरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही केवळ सौजन्यपूर्ण भेट होती. या बैठकीत केवळ सामान्य सौजन्याच्या विषयावर चर्चा झाली. चीनमध्ये (China) तिसरा कार्यकाळ सुरू केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. तसेच, 24 महिन्यांनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच आमने-सामने भेट होती.

जी-20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. सुनक यांनी अलीकडेच ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लिहिले की, "ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना पाहून आनंद झाला. आगामी काळात एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.

जी-20 गटाने एक निवेदन जारी करून रशियाच्या आक्रमकतेचा तीव्र निषेध केला. युक्रेनच्या भूभागातून रशियाची पूर्ण आणि शांततापूर्ण माघार घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे युक्रेनबाबत रशियाविरुद्धच्या निर्बंधांबाबत वेगवेगळ्या देशांची मते वेगवेगळी आहेत. तसेच, जी-20 च्या निवेदनात असेही म्हटले आहे की हे सुरक्षेचे प्रश्न सोडवण्याचा मंच नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी जी-20 परिषदेला हजेरी लावली नाही.

G-20 चे अध्यक्षपद भारताला मिळणार

बाली परिषदेच्या समारोप समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती G-20 चे अध्यक्षपद भारताकडे सोपवणार आहेत. 1 डिसेंबर 2022 पासून भारत अधिकृतपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारे. यानंतर, भारत 2023 मध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com