दहशतवादासाठी अफगाणिस्तानचा उपयोग होऊ नये: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल G -20 शिखर परिषदेत भाग घेतला
G20 Summit: Prime Minister Narendra Modi address on Afghanistan Issue
G20 Summit: Prime Minister Narendra Modi address on Afghanistan Issue Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल G -20 शिखर परिषदेत भाग घेतला काल झालेल्या शिखर परिषदेत अफगाणिस्तानवर (Afghanistan) चर्चा झाली आहे . इटालियन पंतप्रधान मारिओ ड्रॅगी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून या बैठकीत अफगाणिस्तानमधील दहशतवादाची चिंता आणि मानवी हक्कांवर चर्चा झाली आहे. बैठकीत, भारताचे पंतप्रधान मोदी यांनी अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवण्यासाठी इटालियन जी 20 प्रेसिडेन्सीच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील जुन्या संबंधांवर देखील त्यांनी भर दिला आहे. (G20 Summit: Prime Minister Narendra Modi address on Afghanistan Issue)

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दोन दशकांमध्ये भारताने अफगाणिस्तानमधील युवक आणि महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकास आणि क्षमता वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. भारताने अफगाणिस्तानमध्ये 500 हून अधिक विकास प्रकल्प राबवले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी, अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये भारताबद्दल मैत्रीची भावना आहे. ते म्हणाले की भूक आणि कुपोषणाला सामोरे जाणाऱ्या अफगाण लोकांच्या वेदना प्रत्येक भारतीयाला जाणवतात. पंतप्रधानांनी बैठकीला संबोधित करताना अफगाण नागरिकांना आणि सर्वसमावेशक प्रशासनाला त्वरित आणि निर्बाध मानवतावादी मदतीचे आवाहन केले. ते म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय संकट काळात अफगाणिस्तानच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे, त्याची सर्वात जास्त गरज आहे.

G20 Summit: Prime Minister Narendra Modi address on Afghanistan Issue
सावरकरांना बदनाम केलं गेलं आणि आता... मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

या व्यतिरिक्त, पंतप्रधानांनी अफगाणिस्तानच्या भुमीला कट्टरतावाद आणि दहशतवादाचे स्रोत बनण्यापासून रोखण्यावर भर दिला. त्यांनी या भागात कट्टरतावाद, दहशतवाद आणि अंमली पदार्थ आणि शस्त्रांच्या तस्करीच्या संयुक्त विरोधात संयुक्त लढा वाढवण्याच्या गरजेबद्दल देखील त्यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com