तेलंगाना: कबड्डी टूर्नामेंट दरम्यान गॅलरी कोसळल्याने मोठा अपघात; मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

तेलंगणाच्या सूर्यापेटमध्ये एक भीषण अपघात झाला. तिथे कबड्डी स्पर्धेदरम्यान अचानक एक गॅलरी कोसळली. या मैदानावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे 1500 लोक या अपघातात एकमेकांवर पडले.

तेलंगणा: तेलंगणाच्या सूर्यापेटमध्ये एक भीषण अपघात झाला. तिथे कबड्डी स्पर्धेदरम्यान अचानक एक गॅलरी कोसळली. या मैदानावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे 1500 लोक या अपघातात एकमेकांवर पडले. या अपघातात 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर दोन लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यांना उत्तम उपचारासाठी हैदराबाद येथे पाठविण्यात आले आहे.(Gallery collapse during kabaddi competition in Suryapet an accident of 1500 people)

मिळालेल्या माहितीनुसार, 47 व्या राष्ट्रीय कनिष्ठ कबड्डी स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. सूर्यापेटच्या मैदानावर तीन गॅलरी बनवल्या गेल्या. प्रत्येक गॅलरीत सुमारे 5000 लोकांना बसण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मैदानावर सुमारे 15000 प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आहे.  देशातील 29 राज्यांमधील कबड्डीपटू या तुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत.

घटनेच्या वेळीचा हा व्हिडिओही सध्या सोशल मिडियावरून समोर आला आहे. यात गॅलरी अचानक कोसळताना दिसत आहे. यानंतर प्रेक्षक अचानक खाली पडतात. यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होतांना दिसत आहे.

संबंधित बातम्या