Gambusia and Guppy: डेंग्यु्च्या रुग्णांसाठी रामबान उपाय

उत्तर प्रदेश प्रशासनाने 25,000 गप्पी मासे तलाव, विहिरी आणि लहान पाणवठ्यांमध्ये सोडले
Gambusia and Guppy: डेंग्यु्च्या रुग्णांसाठी रामबान उपाय
Gambusia and Guppy fishDainik Gomantak

कोरोनाचा (Covid-19) धोका कमी झाला नसताना उत्तरप्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये व्हायरल ताप आणि डेंग्यूने (Dengu) कहर केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेश प्रशासनाने (UP Government) 25,000 गप्पी (Guppy) मासे तलाव, विहिरी आणि लहान पाणवठ्यांमध्ये सोडले आहे. हे मासे मलेरिया आणि डेंग्यूसारख्या डासांपासून होणाऱ्या रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी ओळखले जातात.

डेंगूच्या डासांच्या अळ्या खाण्याच्या क्षमतेसाठी हे मासे नामांकित आहेत. या माश्यांना सामान्यपणे गम्बुसिया (Gambusia and Guppy) म्हणून देखिल ओळखले जातात. डेंग्यू आणि मलेरियाला आळा घालण्यासाठी राज्यभरातील आरोग्य विभाग त्यांचा वापर करतात. माशांच्या रोपांचे पॅकेट फक्त पाणवठ्यांमध्ये सोडले जातात, त्यानंतर पूर्ण वाढलेले मासे दररोज 100 अळ्या खातात.

Gambusia and Guppy fish
या खास लाल प्रकारच्या भेंडीची किंमत ऐकूण व्हाल आवाक!

डासांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ओळखले जाणाऱ्या, गंबुसिया माशाची भूक तीव्र असते आणि डासांच्या अळ्या हा त्यांच्या आहाराचा एक मुख्य भाग असतो. ते झूप्लँक्टन, माइट्स, बीटल आणि इतर अपरिवर्तक प्राणी देखील खातात.

द ट्रिब्यून मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, चंदीगड यूटी मधील पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनाचे संयुक्त संचालक डॉ. कंवरजित सिंग म्हणाले, प्रौढ गंबुसिया आठ तासांच्या कालावधीत 150 डासांच्या अळ्या खाऊ शकतो. हे त्यांना डेंगुचे डास नियंत्रणासाठी एक उत्कृष्ट जैविक साधन बनवते कारण प्रौढ डास या अळ्या विकसित होण्यापूर्वीच खावून टाकतात. 2019 आणि 2020 मध्ये, या माशांचा वापर गुरुग्राममध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यात करण्यात आला होता जो यशस्वी झाला असे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार सांगण्यात आले.

अगदी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डासांच्या नियंत्रणासाठी या माशांच्या वापराचा अभ्यास केला आहे. डब्ल्यूएचओच्या पूर्व भूमध्यसागरीय, कैरोसाठी प्रकाशित केलेल्या 2003 च्या पेपरनुसार, डासांच्या अळ्यांना खाणाऱ्या माशांच्या काही प्रजाती वापरण्याची ही रणनीती प्रौढ डासांऐवजी अळ्याला लक्ष्य करते याच पेपरमध्ये असेही म्हटले आहे की ज्ञात अळ्याजन्य क्षमता असलेले देशी किंवा विदेशी मासे लार्वा नियंत्रणासाठी वापरले जाऊ शकतात आणि वैज्ञानिकदृष्ट्या मलेरिया नियंत्रणासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. या माशांमध्ये उथळ पाणवठ्यांमध्ये टिकून राहण्याची क्षमता आहे, ज्याला डासांचे उत्तम प्रजनन स्थळ म्हणून ओळखले जाते.

Gambusia and Guppy fish
Indian Navy करणार कारवार ते नवी दिल्लीपर्यंत मोटरसायकल प्रवास

जैविक शस्त्रे

डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी अनेक आरोग्य विभाग गप्पी माशांचा वापर करतात. तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि अगदी गुजरातमध्ये “गप्पी ड्राइव्ह” चालवले गेले आहेत, तर पंजाबच्या मोहाली आणि अमृतसर आणि हरियाणाच्या पंचकुलामध्ये राजधानी चंदीगडसह गंबुशियाचा वापर नागरी प्रशासनांनी केला आहे.

मात्र, डासांचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी गॅम्बुसिया आणि गप्पी फिशचा जैविक शस्त्र म्हणून वापर केल्याने अगदी उलट परिणाम झाला आहे. ओडिशामधील कटक महानगरपालिकेच्या चार हॅचरीज डासांच्या प्रजनन स्थळामध्ये बदलल्या आहेत, असे द न्यू इंडियन एक्स्प्रेसमधील अहवालात म्हटले आहे. याचे कारण असे की सर्व हॅचरीज गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल अभावामुळे पडून आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी साचल्याने हे डासांचे प्रजनन केंद्र बनले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com