Ganesh Chaturthi: बेळगावात यंदा पाच दिवस गणपती

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावरून सरकारी पातळीवर आयोजनाबाबत मतभेद होते.
Ganesh Chaturthi
Ganesh ChaturthiDainik Gomantak

बंगळूर: राज्यात (Karnataka) सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने (Government) सशर्त अनुमती दिली आहे. साध्या व पारंपरिक पद्धतीने पाच दिवस सार्वजनिक गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) साजरा करता येईल.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, यांनी आज तज्ज्ञांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सशर्त परवानगी दिली. कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावरून सरकारी पातळीवर आयोजनाबाबत मतभेद होते. त्यामुळे लोकांतही संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, लोकप्रतिनिधी व गणेश भक्तांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याची मागणी होऊ लागली.

Ganesh Chaturthi
कोरोनामुळे भारतात अडकलेले पाकिस्तानी नागरिक अखेर मायदेशी परतले

या सर्व गोष्टींचा विचार करून अखेर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र साधेपणाने आयोजन करण्याची अट घालण्यात आली आहे. या काळात कोणतेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. गोंधळ, गर्दी न करता पारंपरिक पद्धतीने गणेश पूजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ganesh Chaturthi
लस खरी की खोटी कशी ओळखायची केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

दरम्यान बेळगावात राजकीय वारे ही वाहतायेत. राजकीय पटलावर दीर्घकाळ परिणाम करणारा येथील महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. निवडणुकीत कमी मतदान झाल्याने उत्सुकता कमालीची ताणली गेली असून, 58 प्रभागांतील 385 उमेदवारांपैकी कोणाला मतदारांनी आपला कारभारी म्हणून निवडला आहे, यावर शिक्कामोर्तब होईल. आखाड्यातील उमेदवारांसह समर्थकांची धाकधूक वाढली असून, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, वा सत्तेच्या जादुई आकड्यापर्यंत पोचण्यासाठी जनतेने कोणाला कौल दिला आहे, या साऱ्या एक आठवड्यापासून ताणल्या गेलेल्या प्रश्‍नांची उकल होणार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com