गुंड विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक

पीटीआय
शुक्रवार, 10 जुलै 2020

महांकालेश्‍वर मंदिरातून घेतले ताब्यात; विरोधकांची टीका

भोपाळ/लखनौ

उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांच्या हत्येतील मुख्य आरोपी कुख्यात कुख्यात गुंड विकास दुबे याला मध्य प्रदेशमधील महाकालेश्‍वर मंदिरात गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. त्याचे दोन साथीदार बिट्टू व सुरेशलाही अटक झाली आहे.
गेल्या आठवड्यात कानपूरमधील बिकरु गावातील घरातून दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दुबे व त्याच्या साथीदारांनी बेछूट गोळीबार केला होता. या उपअधीक्षकासह आठ पोलिस ठार झाले होते. त्यानंतर पोलिस सहा दिवस त्याचा कसून शोध घेत होते. चार राज्यांमध्ये सुरू असलेल्या या शोधमोहिमेचा अखेर आज सकाळी झाला. उज्जैनमधील महाकालेश्‍वर मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडत असताना पोलिसांनी अटक केली. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार तो देवासाठी पूजेचे साहित्य घेत असताना एका दुकानदाराने दुबेला ओळखले. दुबे मंदिरातून बाहेर पडताना सुरक्षा रक्षकाला त्याला हटकले. दुबेने त्याच्या तरुणपणाचे बनावट ओळखपत्र त्याला दाखविले. त्यावर त्याचे ‘पॉल’ असे खोटे नाव लिहिले होते. सुरक्षा रक्षकाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसऱ्या एका माहितीनुसार दुबे सकाळी मंदिरात आला होता. पोलिस ठाण्याजवळील केंद्रातून त्या २५० रुपयांचे तिकीट खरेदी केले आणि तो देवासाठी प्रसाद खरेदी करण्यासाठी गेला असता दुकानदाराने त्याला ओळखले आणि पोलिसांना कळविले. पोलिसांनी नाव विचारले असता त्याने मोठ्या आवाजात ‘विकास दुबे’ असे सांगितले. त्यानंतर पोलिस आणि मंदिरातील खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.
पोलिसांनी सांगितले की, दुबे हरियानातील फरिदाबादमध्ये प्रथम दिसला होता. त्यानंतर तो राजस्थानमधील कोटाहून उज्जैनला मोटारीने आला. त्याच्याबरोबर दोन साथीदारही होते. पांढरा टीशर्ट आणि मास्क लावला होता. दुबेच्या अटकेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह म्हणाले की, मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपर्कात असून गुन्हेगाराला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, ‘‘विकास दुबे हा क्रूर खुनी आहे. त्याची अटक हे पोलिसांचे मोठे यश आहे. दुबेला अटक कशी झाली याबाबत आत्ताच काही सांगणे योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.
‘मी विकास दुबे’
एका सीसीटीव्ही चित्रीकरणात मास्क घातलेल्या विकास दुबेला पोलिसांचे पथक घेऊन जात असताना दिसत आहे. पोलिसांच्या वाहनात त्याला नेत असताना ‘मी विकास दुबे आहे, कानपूरवाला,’ असे तो ओरडून सांगत असल्याचे दिसत आहे.

दोन साथीदार चकमकीत ठार
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या चकमकीत दुबेचे आणखी दोन साथीदार ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. कार्तिकेय ऊर्फ प्रभात हा कानपूरमध्ये पोलिस कोठडीतून पळून जात असताना त्याला मारण्यात आले. प्रवीण ऊर्फ बवुआ दुबे या एटवाह येथे ठार केले. कार्तिकेयला बुधवारी (ता. ८) फरिदाबादमधून अटक केली होती. त्याला कानपूरला आणले जात असता पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला होता, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदे व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले.

अटक की शरणागती
दुबेला अटक झाली की तो पोलिसांना शरण आला याबद्‍दल अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. काँग्रेसचे नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह म्हणाले की, दुबेची अटक म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांच्या बचावासाठीचे नियोजनपूर्वक आत्मसमर्पण आहे. मध्य प्रदेशमधील भाजपच्या एक वरिष्ठ नेत्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मला वाटते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री म्हणाले की, कानपूरकांडातील मुख्य आरोपी आता पोलिस कोठडीत असल्याचे मी ऐकले. ते खरे असले तर ही अटक आहे का शरणागती याचा खुलासा सरकारने करायला हवा.

यूपी सरकार अपयशी ः प्रियांका गांधी
गुंड विकास दुबे याच्या अटकेवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकावर टीका केली. आरोपी उज्जैनला पोचण्यामागे संगनमत झाल्याचे दिसत आहे. ट्विटमध्‍ये त्यांनी म्हटले आहे की, कानपूरमध्ये जे निर्दयी हत्याकांड घडले त्यानंतर ज्या वेगाने काम करायला हवे होते त्यात यूपी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दक्षतेच्या इशाऱ्यानंतरही आरोपी उज्जैनला पोचतो यावरुन सुरक्षेचे दावे तर फोल ठरतातच, शिवाय संगनमताकडेही संशयाची सुई जात आहे. तीन महिन्यांपूर्वीच्या पत्रावर ‘नो ॲक्शन’ असा शेरा आणि कुख्यात गुन्हेगारांच्या यादीत ‘विकास’चे नाव नसण्यावरून या प्रकरणाची पाळेमुळे किती
दूरपर्यंत पोचली आहेत, हे लक्षात येते. यूपी सरकारने याची ‘सीबीआय’ चौकशी करून सत्य परिस्थिती व सुरक्षेचे मुद्दे जगजाहीर करायला हवेत, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.

प्रदेशात त्याची सासुरवाडी आहे. तो दरवर्षी महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला जातो. भोलेबाबाने माझ्या मुलाचा जीव वाचवला आहे. सरकारने त्याला अभय द्यावे.
सरलादेवी, विकास दुबेची आई

संपादन - अवित बगळे

 

संबंधित बातम्या