चीन संघर्षानंतर सेनाप्रमुख जनरल नरवणे यांचे मोठे वक्तव्य

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

भारताने आपला कोणताही प्रदेश गमावला नाही, दोन्ही देशांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे.

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारत-चीन यांच्यात संघर्ष सुरु झाल्यावर तब्बल एका वर्षानंतर भारतीय जनरल प्रमुख एम.एम. नरवणे यांनी म्हटले की, भारताने आपला कोणताही प्रदेश गमावला नाही, दोन्ही देशांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, जनरल नरवणे म्हणाले, कॉपर्स कमांडर स्तरीय चर्चेच्या नवव्या फेरीनंतर टप्प्याटप्प्याने दोन्ही सैन्य मागे हटले आहेत. मला सांगावेसे वाटते की, आपण कोणताही प्रदेश गमावलेला नाही.

सेनाप्रमुख म्हणाले की, भारताने प्रश्न सोडवण्य़ासाठी संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. ते पुढे म्हणाले, ‘’गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्ज यासारख्या ठिकाणांबाबात चीन बरोबर सध्या चर्चा सुरु आहे.’’ (General Narwanes big statement after the China conflict)

‘’जुडासने इसा मसिहाला धोका दिला’’ असं म्हणतं मोंदीचा पिनरयी विजयन सरकारवर...

मागील वर्षी एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील कडक कारवाईत भारतीय आणि चीनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भारत आणि चीन यांच्यात मंत्रीस्तरीय आणि लष्करी अधिकारी स्तरावरील बैठकींच्या नऊ फेऱ्या पार पडल्या तरीही पूर्व लडाखमधील पूर्णपणे परिस्थिती सामान्य झाली नाही. भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा धोका आणि युध्दाची शक्यता याबद्दल बोलताना जनरल नरवणे म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर आपल्याला आव्हाने आहेत आणि त्यासाठी आपण सदैव तयार आहोत.

 

संबंधित बातम्या