''कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा!'', केंद्रीय वैद्यकीय सल्लागारांचा इशारा

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वाढता प्रसार पाहता ते होणार आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून भारतामध्ये दिवसाला तीन लाखाच्या वर कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यासोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत असल्याने अपुऱ्या ऑक्सिजनअभावी अनेक कोरोना रुग्णांचे प्राणही जात आहेत. त्यातच आता केंद्र सरकारचे वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा  दिला आहे.  दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिता  आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी माहीती दिली आहे. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे आता देशातील आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचेही सल्लागारांनी अधोरेखित केलं आहे. (Get ready for the third wave of corona Warns central medical advisers)

केंद्र सरकारचे मुख्य वैद्यानिक सल्लागार के.विजय राघवन (VijayRaghavan) यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशातील कोरोना स्थितीवर भाष्य केलं आहे. ''देशात कोरोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वाढता प्रसार पाहता ते होणार आहे. परंतु देशात कोरोनाची तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. देशातील सर्व नागरिकांनी  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार रहायला पाहिजे,'' असं ते यावेळी म्हणाले.  गेल्या चोवीस तासामद्ये 3 लाख 82 हजार 315  नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

राहुल गांधींचे केंद्र सरकारला 'पाच' गंभीर प्रश्न

दरम्यान, भारतात सध्या दिल्या जाणाऱ्या लसी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर परिणामकारक असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट जसा जगभरात सापडत आहे तसा भारतात देखील सापडणार असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले. देशात सद्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने बनवलेल्या अनुक्रमे कोवीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींना लसीकरणासाठी मान्यता दिली आहे.   

संबंधित बातम्या