लग्न होणारच! नवरदेवाला कोरोनाची लागण, पीपीई किट घालून नवरी कोरोना वार्डात

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 एप्रिल 2021

नवरी मुलगी पीपीई किट घालून मेडिकल महाविद्यालयाच्या कोरोना वार्डात पोहचली.

देशात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. महाराष्ट्रासंह (Maharashtra) अनेक राज्यांनी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान सोशल मिडियावर एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. केरळमधील (Kerala) एका जोडप्यानं अल्लाप्पुझा मेडिकल महाविद्यालयाच्या (Alappuzha Medical College) कोरोना वार्डातच लग्नाची गाठ बांधली. विवाहाच्या काही दिवस आधिच नवरदेवाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवरी मुलगी पीपीई किट घालून मेडिकल महाविद्यालयाच्या कोरोना वार्डात पोहचली आणि त्याच ठिकाणी दोघांनी लग्नगाठ बांधली. (Getting married Coronary infection to Navradeva wearing PPE kit in Navri Corona ward)

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक जोडप्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विवाहसोहळे पुढे ढकलले आहेत. मात्र केरळमधील या जोडप्यानं लग्नगाठ बांधायचं नक्कीच केलं. आणि कोरोना वार्डातच कोरोनाचे प्रोटोकॉल पाळत अखेर लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच यांचं लग्न ठरलं होतं. मात्र त्या दरम्यान नवऱ्या मुलाला कोरोनाची लागण झाली आणि यक्ष प्रश्न उभा ठाकला.

भारत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या खरचं लपवत आहे का ? 

नवरदेवाला काही दिवस आगोदर कोरोनाची लागण झाली आणि त्याला अलाप्पुझा येथील मेडिकल कॉलेजमध्येच तयार करण्यात आलेल्या कोरोना वार्डात दाखल करण्यात आलं होतं. कैनाकरी इथं राहणाऱ्या सारथ आणि अभिरामी अशी कोरोना वार्डात लग्न केलेल्या जोडप्यांची नावे आहेत. लग्नविधी संपन्न झाल्यानंतर दोघा जोडप्यांना अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी दाखल केलं.नवऱ्या मुलाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियं लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेणार होते. तेव्हा जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांकडून यासंबंधीची परवानगी घेण्यात आली होती. मात्र शेवटी  या जोडप्याने कोरोना वार्डातच लग्नगाठ बांधली. कोरोना वार्डातील कोरोना रुग्ण या जोडप्यांच्या लग्नाचे साक्षीदार बनले. कोरोना वार्डामध्येच नवरी आणि नवरदेवासंह अनेक नातेवाईक पीपीई किट घालून लग्नासाठी उपस्थित होते. यावेळी नवऱ्यामुलाच्या आईने दाम्पत्याला हार दिले आणि पुढचे विधी करण्यात आले. 
 

संबंधित बातम्या