Ghaziabad: एकाच वेळी 3 पिढ्या संपवणाऱ्या ड्राव्हरला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

Ghaziabad News: दरोड्याच्या उद्देशाने संपूर्ण कुटुंबाची हत्या करणाऱ्या चालक राहुल वर्माला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
Crime
CrimeDainik Gomantak

Ghaziabad News: गाझियाबादमध्ये 9 वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडात न्यायाची प्रतीक्षा संपली आहे, ज्यामध्ये एका व्यावसायिकाच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली होती. दरोड्याच्या उद्देशाने संपूर्ण कुटुंबाची हत्या करणाऱ्या चालक राहुल वर्माला अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंडही राहुलला ठोठावला आहे. कुटुंबातील 7 जणांची हत्या हा गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, न्यायालयाने शनिवारी राहुलला दोषी ठरवले. राहुलच्या शिक्षेवरील युक्तिवादासाठी 1 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 21 मे 2013 रोजी घंटाघर नई बस्ती परिसरात ही खळबळजनक घटना घडली होती. हे हत्याकांड करुन व्यापारी सतीश गोयल (Satish Goyal) यांचा चालक राहुल वर्मा हा लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पळून गेला होता. आता तो जवळपास 9 वर्षांपासून डासना कारागृहात आहे.

Crime
Triple Talaq: मुलगी झाली...', पतीने दिला फोनवरुन तिहेरी तलाक, उज्जैनमध्ये FIR दाखल

गुन्हा कसा घडला?

घंटाघर कोतवाली परिसरात 21 मे 2013 च्या रात्री एक खळबळजनक घटना घडली. घंटाघर नई बस्ती परिसरात राहणारे वृद्ध व्यापारी सतीश गोयल आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची चाकूने हत्या करण्यात आली. याप्रकरणी मयत व्यावसायिकाचे जावई सचिन मित्तल यांनी कोतवाली पोलिस (Police) ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मृतांमध्ये व्यापारी सतीश गोयल, त्यांची पत्नी मंजू गोयल, मुलगा सचिन गोयल, सून रेखा गोयल आणि तीन नातवंडांचा समावेश होता.

Crime
Lumpy Disease in Gujrat: गुजरातमध्ये लम्पी त्वचा रोगाचा कहर, 1240 जनावरं दगावली

15 दिवसांपूर्वी पैसे घेऊन पळून गेला होता, परत आल्यानंतर सर्वांची हत्या झाली होती

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. घटनेच्या 10 दिवसांनंतर, खळबळजनक खुनाच्या आरोपाखाली राहुल वर्माला 22 मे रोजी अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले. राहुलकडून पोलिसांनी सहा हजार रुपये आणि लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले. दोन दिवसांनंतर, 24 मे रोजी कोतवाली पोलिसांनी मारेकरी राहुल वर्माला अटक केली. खुनात वापरलेला चाकू आणि रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले. राहुल वर्मा हा सतिश गोयल यांचा चालक होता. घटनेच्या सुमारे 15 दिवस आधी व्यापारी सतीश गोयल यांच्या घरातून 4.5 लाख रुपये चोरुन राहुल फरार झाला होता. तेव्हापासून तो नोकरीवर परतला नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com