
Ghaziabad Jail: उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या डासना तुरुंगात 140 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही बाब समोर आल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाने सर्व कैद्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 5500 कैद्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 140 कैद्यांचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हणाले कारागृह प्रशासन?
त्याचवेळी, 17 कैद्यांमध्ये टीवी संसर्ग आढळून आला आहे. बाधित कैद्यांना एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर इतक्या कैद्यांना (Prisoner) संसर्ग कसा झाला याचा तपास करण्यात आरोग्य पथक व्यस्त आहे.
तसेच, तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची कबुली कारागृह अधीक्षक आलोक कुमार सिंग यांनी दिली. त्यांनी सांगितले की, 'हापूरचे कारागृह गाझियाबादमध्येही आहे, त्यामुळे येथील तुरुंगात कैद्यांची संख्या जास्त आहे. मी 140 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांना सांगितले आहे की घाबरण्याचे काही नाही, ही एक नियमित चाचणी आहे. रुग्णाचे (Patient) निदान होताच त्यांच्यावर उपचार सुरु होतील.' त्यांनी पुढे सांगितले की, बहुतेक नशा करणाऱ्यांना याची लागण झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.