घोटणेकर यांचा हेगडे यांना टोला

Dainik Gomantak
सोमवार, 29 जून 2020

हल्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतरचे कवित्व सुरू

हल्याळ
हल्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रामनगर गटाच सदस्य कॉंग्रेसचे वसंत हरीजन यांचे अहरहणही या समितीच्या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव रोखू शकले नाही असा टोला काँग्रेस विधानपरिषद सदस्य एस .एल. घोटणेकर यांनी हाणला आहे. या समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षप पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने एक मताने आपले उमेदवार विजयी केले.
या निवडणुकीत भाजप नेते माजी आमदार सुनील हेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र घोटणेकर यांनी या निवडणुकीत विजय संपादन केला.  कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपला ही चपराक आहे असे घोटणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 
ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली चार वर्षे कॉंग्रेसची सत्ता आहे. माजी आमदार सुनील हेगडे यांनी हस्तक्षेप करून  रामनगर  क्षेत्रातील काँग्रेस प्रणीत सदस्य वसंत हरीजन यांचे अपहरण करून कृषी क्षेत्राला काळीमा फासत, जनतेचा अपमान केला आहे. त्यांच्या या जकारणाला बाजार समितीच्या काँग्रेस सदस्यांनी चोख प्रत्युत्तर देत  अध्यक्ष, उपाध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राखले आहे.  सुनील हेगडे एक व्यापारी राजकारणी असून जनतेचे नेते नाहीत. त्यांनी यापुढे विधानसभा निवडणूक लढविण्याच्या अगोदर संस्था पातळीवर निवडणूक लढवावी असे त्यांना आव्हान आहे. या निवडणुकीचा त्यांनी धडा घेऊन घाणेरडे राजकारण न करता मराठा समाजात फूट पाडण्याचे कार्य त्यांनी कदापि करू नये. तसे केल्यास पुढील निवडणुकीत हल्याळ-जोयडा मतदारसंघातील जनता योग्य धडा शिकवेल.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्रीनिवास  घोटणेकर, उपाध्याक्ष संतोष मिराशी, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य कृष्णमूर्ती पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सदस्य नागराज एस. पाटील, सहकार नेते शिवपुत्र नुचम्बली, नगरसेवक अनिल चव्हाण, बाळकृष्ण शहापूरकर, नागराज पाटील, मधू कदम उपस्थित होते.

संबंधित बातम्या