''राज्यसभेतून निवृत्त झालो आहे, राजकारणातून नाही'' 

दैनिक गोमन्तक
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

सर्व धर्मांचा, लोकांचा आणि जातींचा समान आदर करणे हे काँग्रेस पक्षाचे सामर्थ्य असल्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.

सर्व धर्मांचा, लोकांचा आणि जातींचा समान आदर करणे हे काँग्रेस पक्षाचे सामर्थ्य असल्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. आज जम्मूमध्ये गांधी ग्लोबल फॅमिली पीस कॉन्फरन्ससाठी काँग्रेस पक्षातील जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह कपिल सिब्बल, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, आनंद शर्मा, मनीष तिवारी आणि विवेक तनखा उपस्थित होते. यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद यांनी, जम्मू असो, काश्मीर असो किंवा लडाख, आपण सर्व धर्मांचा, लोकांचा आणि जातींचा आदर करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण सर्वांचा तितकाच आदर करतो आणि हेच आमले सामर्थ्य असून, यापुढेही राहणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी नमूद केले. 

जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीबद्दल बोलताना, मागील पाच ते सहा वर्षात जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यांवरून या सर्व नेत्यांनी आपल्या पेक्षा तुसभर देखील कमी संसदेत बोलले नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सांगितले. बेरोजगारी, राज्याचे विशेष कलम, उद्योग व शिक्षण आणि जीएसटी बद्दल आपल्याइतकाच आवाज उपस्थित नेत्यांनी संसदेत उठवला असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. यानंतर आपण राज्यसभेतून निवृत्त झालो असल्याचे सांगत, मात्र राजकीय क्षेत्रातून निवृत्त झालो नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी अधोरेखित केले. 

राहुल गांधीचा मोदी सरकार व राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर हल्लाबोल

याव्यतिरिक्त, बर्‍याच वर्षांनंतर जम्मू काश्मीरची उपस्थिती संसदेतील राज्यसभेत नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणात सांगितले. व कदाचित यामुळे आपली ओळख संपली असल्याचे पुढे ते म्हणाले. तसेच, राज्याचा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला संसदेच्या आत आणि बाहेर लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आणि राज्यात निवडलेले मंत्री आणि मुख्यमंत्री नसतील तोपर्यंत बेरोजगारी, रस्ते आणि शाळांची दयनीय अवस्था अशीच राहणार असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. गुलाम नबी आझाद यांच्या सोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी यावेळी बोलताना काँग्रेस हा कमकुवत झाला असल्याचे सांगितले. व तसेच आता पुन्हा काँग्रेसला मजबूत करणे गरजेचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला.    

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळच्या दौऱ्यावर असताना उत्तर भारतीयांच्या संबंधित एक वक्तव्य केले होते. आणि त्यानंतर काँग्रेसच्या पक्षातील काही नेत्यांची नाराजी समोर आली होती. व जम्मू मध्ये आयोजित करण्यात आलेली ही बैठक म्हणजे काँग्रेसचे सामर्थ्य दाखविण्यासाठी आणि उत्तर ते दक्षिण पर्यंत भारत हा एक असल्याचे दर्शविण्यासाठी घेण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले होते.     

संबंधित बातम्या