
Tamil Nadu Crime: तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नमक्कल जिल्ह्यातील एका 14 वर्षीय मुलीचा 18 सप्टेंबर रोजी चिकन शोर्मा खाल्ल्याने मृत्यू झाला.
अन्नातून विषबाधा झाली असल्याचे सांगितले जात आहे. मृत मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी 17 सप्टेंबरच्या रात्री एका रेस्टॉरंटमध्ये चिकन शोर्मा खाल्ले होते.
दरम्यान, त्याच रात्री मुलीला अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 18 सप्टेंबर रोजी मुलीचे निधन झाले. मृत मुलगी नमक्कल पालिका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होती.
तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नमक्कल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी (Police) रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करुन असून तपास सुरु केला आहे.
दुसरीकडे, पोलिसांनी ताबडतोब रेस्टॉरंटवर छापा टाकला, अन्नाचे नमुने गोळा केले आणि रेस्टॉरंटचे मालक नवीन कुमार आणि दोन स्वयंपाकी, संजय महागुर आणि धबश कुमार यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेतले. IPC कलम 304, 389 आणि 273 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. एस. उमा यांनी सांगितले की, शनिवार आणि रविवारी रेस्टॉरंटमध्ये जेवलेल्या 200 लोकांपैकी 43 जणांना विषबाधा झाल्याचे आढळले, ज्यात पाच मुले आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. त्यांना उलट्या, पोटदुखी, ताप आणि इतर लक्षणे दिसून आली आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, शनिवारी त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवलेल्या 13 वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले तेव्हा अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यातील हॉटेलमध्ये चिकन शोर्मा, तंदूरी आणि ग्रील्ड चिकनच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून, अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट तात्पुरते बंद केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.