कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पित्याच्या चितेवर मुलीने घेतली उडी

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

राजस्थान मध्ये घडलेल्या या घटनेनंतर काळजाचा थरकाप उडल्या शिवाय राहणार नाही. 

कोरोना विषाणूच्या संक्रमणाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून देशात मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच जातो आहे. आशा परिस्थिती मध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना गमावलं असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. दिवसभरात अशा अनेक नकारात्मक बातम्या आपल्यासमोर येऊन धडकत असतात. मात्र राजस्थान मध्ये घडलेल्या या घटनेनंतर काळजाचा थरकाप उडल्या शिवाय राहणार नाही. 

कोरोनामुळे पित्याचा मृत्यू झाल्यानंतर दुःख अनावर झालेल्या मुलीने पित्याच्या जळत्या चितेवर उडी घेत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आगीने गंभीररित्या जळालेल्या तरुणीला पोलिसांनी दवाखान्यात दाखल केले. 

भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांवर ओवैसी यांची प्रतिक्रिया

राजस्थानच्या (Rajsthan) बाडमेर जिल्ह्यात 73 वर्षीय दामोदरदास शारदा यांचा मंगळवारी सकाळी कोरोनामुळे (Corona) मृत्यु (Death) झाला. रविवारी त्यांना बाडमेरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने  कोरोना प्रतिबंधक नियमानुसार स्मशान भूमीमध्ये मृतदेह घेऊन जात नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार केले. मृत दामोरदतदास यांना तीन मुली असून, सर्वात लहान असलेल्या चंद्रकला यांनी वडिलांच्या जळत्या चितेवर उडी घेतली. या घटनेत चंद्रकला या 70 टक्के भाजल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना जोधपूर येथे पाठवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या