प्रेमभंग! वैतागलेल्या प्रियसीचा प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला

केरळमधील (Kerala) इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील आदिमाली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रेमभंग! वैतागलेल्या प्रियसीचा प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला
Girlfriend upset with breakup did acid attack in Kerala Dainik Gomantak

केरळमधील (Kerala) इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील आदिमाली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इडुक्की येथील एका तरुणाचे त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपमुळे नाराज झालेल्या मैत्रिणीने तरुणावर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत तरुणाच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. तिरुअनंतपुरम येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.

आरोपानुसार, तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पूजापुरा येथील रहिवासी अरुण कुमार यांच्यावर आदिमाली इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय शीबाने हल्ला केला. अ‍ॅसिड हल्ल्यात अरुण कुमार यांचा एक डोळा गमवावा लागला. शीबा अरुण कुमारची गर्लफ्रेंड होती आणि ब्रेकअपचा तिला राग आला होता, असं म्हटलं जातं.

Girlfriend upset with breakup did acid attack in Kerala
सिद्धू म्हणतात इम्रान खान 'लहान भाऊ'; खासदार रवी किशनने घेरलं

अरुण कुमार आणि शीबा यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली आणि दोघेही प्रेमात पडले. अरुण कुमारने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने शीबा नाराज होती, असे पोलिसांनी म्हटले आहे. या गोष्टीचा शीबाला इतका राग आला की तिने एवढी मोठी घटना घडवून आणली.

मंगळवारी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता अरुण कुमार यांना आदिमाली इरुम्पुपालम ख्रिश्चन चर्चमध्ये बोलावण्यात आले. शिबाने अरुणच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल्याचा आरोप आहे. शीबाचा चेहरा आणि हातही अ‍ॅसिडच्या फटक्याने भाजले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com