''मुलींनो राहुल गांधींपासून सावध रहा''

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

जॉर्ज यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका करताना मुलींनी राहुल यांच्यापासून संभाळून रहावं त्यांचं अजून लग्न झालेला नाही,

कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकिय हल्ला करताना केरळच्या माजी खासदाराची जीभ घसरली आहे. केरळ खासदार जॉयस जॉर्ज यांच्यावर सध्या टिकेचा भडिमार होताना दिसत आहे. जॉर्ज यांनी आपली मर्यादा ओलांडल्याची टिकाही त्यांच्यावर केली जात आहे. राहुल गांधी यांचे लग्न झाले नाही म्हणून विद्यार्थींनी त्यांच्यासमोर वाकू नये अशा आक्षेपार्ह शब्दामध्ये या खासदाराने राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे.

सीपीआयचे नेते आणि उमेदवार एम.एम. मणी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये जॉयस जॉर्ज यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका करताना मुलींनी राहुल गांधी यांच्यापासून सांभाळून रहावं व त्यांचं अजून लग्न झालेला नाही, असं वक्तव्य केलं आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे आयोजन अशाप्रकारे करण्यात आले आहे की, ते केवळ मुलींच्या महाविद्यालयाला भेट देतात. तिथे राहुल गांधी मुलींना वाकण्यासंबंधी शिकवण देतात त्यामुळे माझी सगळ्या विद्यार्थींनींना विनंती आहे की, त्यांनी राहुल यांच्यासमोर वाकून उभे राहू नये. त्यांच लग्न अद्याप झालेलं नाही.असं आक्षेपार्ह वक्तव्य जॉर्ज यांनी केलं आहे. लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रन्टच्या पाठिंब्यावर जॉयर्स जॉर्ज यापूर्वी खासदार म्हणून निवडूण आले होते. जॉर्ज यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मंचावर उपस्थित असणारे मणी यावर हसताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Girls beware of Rahul Gandhi)

"देवभूमीतले भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि घराणेशाहीमुळे त्रस्त"

केरळ कॉंग्रेसने जॉर्ज यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. सीपीआयला पराभव दिसून येऊ लागल्यामुळे अशाप्रकारची विधाने करत राहुल गांधींना बदनाम करण्य़ाचा प्रयत्न केला जात आहे, असा पलटवार कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतच कोचीमधील संत मदर टेरेसा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. केरळमध्ये सहा एप्रिल होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर राहुल यांच्या संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमादरम्यान मुलींना एकिडोचे (संरक्षण संदर्भात) पाठ देतानाही दिसले होते. महिलांनी संकटाच्या वेळी आपलं स्वत:च संरक्षण कसं करावं यासंदर्भातील काही गोष्टी राहुल यांनी येथील मुलींना सांगितल्या होत्या.  
 
 

संबंधित बातम्या