प्रेमीयुगलाच्या निर्णयामुळे आईला भोगावी लागली शिक्षा

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जून 2021

नालंदा(Nalanda) येथील अस्थमा पोलिस स्टेशन परिसरातील शेरपूर गावात माणुसकीला लाजविणारी घटना उघडकीस आली आहे. ही घटना वाचून कुणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल.

नालंदा: नालंदा(Nalanda) येथील अस्थमा पोलिस स्टेशन परिसरातील शेरपूर गावात माणुसकीला लाजविणारी घटना उघडकीस आली आहे. ही घटना वाचून कुणालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. तर शेरपूर खेड्यातील एका मुलाने गावच्याच एका मुलीवर प्रेम केले. वेळेनुसार प्रेम आणखीनच समृद्ध होत गेले. दोघांनाही एकमेकांशिवाय जगणे कठीण झाले. दोघांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली. पण त्यांच्या प्रेमाच्या मार्गात मुलीचं कुटुंब एक मोठा अडथळा म्हणून उभे राहिले. या दोघांच्याही लग्नासाठी मुलीकडचे कुटूंब काही केल्या तयार नव्हते. अशा परिस्थितीत, शेवटी या प्रेमी युगलाने एक दिवस एकत्र घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि दोघांनी पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला. (The girls family detained the boys mother for 9 hours)

9 तास महिलेला बंदी बनून ठेवले

मुलाच्या आईला ओलीस ठेवण्यात आले, केस कापले आणि खेड्यात फिरले
जेव्हा मुलीच्या घरातील सदस्यांना दोघांच्या या निर्णयाविषयी समजले तेव्हा त्यांचा राग सातव्या असमानात पोहोचला. मुलीचे कुटूंब मुलाच्या घरी पोहचले. आणि मुलाच्या आईला जबरदस्तीने घरातून उचलून धरले आणि तीला डांबून ठेवले. त्यांनी सुमारे 9 तास त्या महिलेला बंदी बनून ठेवले. या दरम्यान मुलाच्या आईवरही वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार करण्यात आले.

3000 कनिष्ठ डॉक्टरांनी दिला एकाच वेळी राजीनामा 

कुटूंबियांनी घातली अट

मुलीचे कुटूंबियांनी अट घातली की,  जोपर्यंत त्यांच्या मुलीला तो मुलगा परत करणार नाही तोपर्यंत त्या मुलाच्या आई सोडणार नाही. हे प्रकरण वाढतच गेलं. मात्र एकाच गावातील  प्रकरण असल्यामुळे ग्रामस्थांना कुणाच्या बाजूने बोलावं आणि कुणाच्या नाही असा प्रश्न पडला. दरम्यान कोणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि महिलेची सुटका करण्यात आली. मुलीच्या कुटूंबाच्या सदस्याकडून होणाऱ्या बदमाशीची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि महिलेची सुटका केली. मात्र, अद्यापही त्या प्रेमी युगलांचा शोध लागला नाही.

अखेर GOOGLE ने त्या चुकीबद्दल कन्नडिगांची मागितली माफी 

गावात तणाव गावात तणाव निर्माण झाला आहे
प्रेमी जोडप्याच्या पळून जाण्याने आणि आईला बंदी केल्यानंतर आता या गोवात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शेरपूर गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे नालंदा सदरचे डीएसपी डॉ. शिबली नोमानी यांनी म्हटले आहे. जो दोषी आढळेल त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल.

संबंधित बातम्या