Rajasthan: 'तलाक, तलाक, तलाक' म्हणणाऱ्या नराधम नवऱ्याने बायकोवर केला हल्ला

Rajasthan: राजस्थानमधील बांसवाडा शहरात एका व्यक्तीने पत्नीला रस्त्यात तिहेरी तलाक देऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Wife
WifeDainik Gomantak

Rajasthan News: राजस्थानमधील बांसवाडा शहरात एका व्यक्तीने पत्नीला रस्त्यातच ट्रिपल तलाक देऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पतीने पहिल्या पत्नीला रस्त्यातच तीनदा 'तलाक, तलाक, तलाक' असे म्हटले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यानंतर पत्नीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. पीडितेची आई तिला वाचवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात राजतलाब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राजतलाब पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील दाहोद रोडवरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. आई साबेरासोबत बाजारात खरेदीसाठी जात असताना आरोपी पती रिजवान अहमद शादने पत्नीवर हल्ला केला. याआधी दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर पतीने तिला खाली ढकलून दुचाकीने धडक दिली. दुसरीकडे, माहिती मिळताच हेडकॉन्स्टेबल महिला पोलिस घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जखमी झालेल्या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, 'आरोपी (Accused) इंदिरा नगरच्या एकजन कॉलनीत राहतो. तो त्याच्या मेहुण्याजवळ राहून वास्तुविशारद म्हणून काम करत आहे.'

Wife
Rajasthan: भारतीय गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई, स्वातंत्र्य दिनापूर्वी 2 पाकिस्तानी हेरांना अटक

तलाक, तलाक, तलाक याबद्दल आधीच बोललो आहे

महिला पोलिस स्टेशनचे एएसआय लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की, '5 दिवसांपूर्वी पीडित परवीनच्या वतीने हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत परवीनने आरोपीविरुद्ध तीन वेळा तलाक दिल्याचे म्हटले आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.'

Wife
Rajasthan: भाजप महिला खासदाराच्या गाडीवर खाण माफियांचा हल्ला!

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह आरोपीसोबत 28 डिसेंबर 2021 रोजी झाला होता. लग्नानंतर आठ दिवसांनी तो हुंड्यासाठी तिचा छळ करु लागला. नुकतेच आरोपीने रतलाम येथील तरुणीशी दुसरे लग्न केले. राजतलाब पोलिस ठाण्याचे प्रभारी रामरुप मीना यांनी सांगितले की, 'गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास केला जात आहे. तात्काळ कारवाई केली जाईल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com