उत्तराखंडमध्ये हिमनदीला तडा; ऋषिगंगा तपोवन प्रकल्पाचा बांध तुटला

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

 उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील हिमनदीला तडा ल्यामुळे मोठ्या धोक्याची भीती निर्माण झाली आहे.

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील हिमनदीला तडा ल्यामुळे मोठ्या धोक्याची भीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमनदी तुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ होत, मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह खाली येत आहे. त्याच भागात ऋषीगंगा तपोवन जलविद्युत प्रकल्प आहे. या घटनेमुळे धरणाचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. दोन बांध तुटल्याची शक्यता आहे, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चामोलीत हिमनदी फुटताच एसडीआरएफचे तसेच डेहराडूनवरून एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्थानिक प्रशासनाने चामोली व आसपासचा परिसरातील लोकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी ट्विट केले आहे की हिमनदी तुटल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  हिमनदी फुटल्याने धौली नदीला पूर आला आहे. पाणी जवळच असलेल्या जोशी मठात पोहोचले आहे. कर्ण प्रयाग आणि रुद्र प्रयागला थोड्याच वेळात पाणी पोहोचल्याची माहिती आहे. यामुळे हरिद्वारचा धोका वाढला आहे. माहिती मिळताच प्रशासनाची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

ऋषीगंगा वीज प्रकल्पाजवळील हिमस्खलनाच्या घटनेनंतर उत्तराखंडच्या धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने अनेक लोक बेपत्ता होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चमोली घटनेच्या वेळी जवळपास 50 मजूर साइटवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या