नंदनवनातील हिमनद्या वेगाने वितळताहेत!

Glaciers in Jammu-Kahsmir melting at significant rate, finds study
Glaciers in Jammu-Kahsmir melting at significant rate, finds study

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील हिमनद्या (ग्लेशिअर) वितळण्याचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे, असे निरीक्षण ‘सायंटिफिक रिपोर्ट’ या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात नोंदविले आहे.

हिमालयीन प्रदेशातील हिमनद्यांच्या वितळण्यासंबंधीचा अभ्यास प्रथमच करण्यात आला आहे. यासाठी उपग्रहीय माहितीचाही वापर करण्यात आला. २००० ते २०१२ या काळात बाराशे हिमनद्यांच्या वस्तुमानात वार्षिक ३५ सेंटिमीटर घट झाली आहे. 

श्रीनगरमधील काश्‍मीर विद्यापीठातील संशोधन अधिष्ठाता प्रा. शकील अहमद रोमशू यांच्‍या नेतृत्वाखाली संशोधन.

विद्यापीठातील भौगोलिक माहिती प्रणाली विभागातील तारिक अब्दुल्ला आणि इरफान रशिद यांचा संशोधक गटात समावेश.

‘सायंटिफिक रिपोर्ट’मधील लेखातील निरीक्षण
‘क्लायमेट चेंज’ या नियतकालिकात २९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार जम्मू- काश्‍मीर व लडाखवर होणारा हवामान बदलाचा परिणाम.

६.९0: शतकाअखेर तापमानवाढ
८५% : हिमनद्या आटण्याचे प्रमाण

संशोधनातील नोंदी
१) काराकोरम पर्वतरांगांपेक्षा पीर पंजालमधील हिमनद्या वितळण्याचा वेग जास्त
२) पीर पंजालमध्ये दरवर्षी एक मीटर वेगाने बर्फ वितळत आहे तर काराकोरममध्ये हा वेग वर्षाला दहा सेंटीमीटर.
३) काराकोरमधील काही हिमनद्या स्थिर 
४) ग्रेटर हिमालयीन पर्वतरांगा, झनसकर, शमाबाडी आणि लेह पर्वतरांगांमधील हिमनद्याही वितळत आहेत, मात्र त्याचा वेग भिन्न आहे.
५) एका दशकातील अभ्यासानुसार हिमालयीन प्रदेशातील हिमनद्यांच्या वस्तुमानात ७०.३२ गिगाटन एवढी मोठी घट झाली आहे.

संशोधकांच्या मते...

  • २०१२ नंतर अशी माहिती (उपग्रहीय निरीक्षणे) जगात उपलब्ध नाही. 
  • काश्‍मीर व लडाखच्या भागात असे संशोधन प्रथमच केले.
  • याआधी केवळ सहा-सात हिमनद्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे.
  • हिमनद्या वितळणे आणि संकोचण्याची प्रक्रिया नियमित घडणारी असली तरी उपग्रहीय माहितीविना हिमनद्यांची जाडी व वस्तुमानातील फरक नोंदणे शक्य नाही. 

हिमनद्या वितळण्यामुळे...
1 प्रत्येक क्षेत्रातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम
2 ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, तेथे जास्त समस्या 
3  जम्मू-काश्‍मीर आणि लडाखमधील पाणी, अन्न व ऊर्जा सुरक्षेवर परिणाम
4 एकूणच या सर्व भागातील उपजीविका अवलंबून असलेल्या सर्व गोष्टींना फटका

हिमनद्या वितळण्याची प्रमुख कारणे
तापमानवाढ, बर्फवृष्टीत घट, औद्योगीकरणामुळे हरितगृहातील वायू उत्सर्जन, जगभरात जीवाश्म इंधनवापराचे वाढते प्रमाण.

गोमन्तक वृत्तसेवा

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com