Delhi विमानतळावर मोठा निष्काळजीपणा, विमानाखाली आली कार; Video Viral

Delhi Airport: दिल्ली विमानतळावरील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
airplanes
airplanesDainik Gomantak

Delhi Airport: दिल्ली विमानतळावरील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रत्यक्षात इथे पार्क केलेल्या इंडिगो विमानाच्या खाली एक कार उभी करण्यात आली. या निष्काळजीपणाचा व्हिडिओही आता समोर आला आहे. इंडिगोचे हे विमान VT-ITJ असल्याचे सांगितले जात आहे. हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल T-2 वर उभे होते.

दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'इंडिगो फ्लाइट 6E-2022 विमानतळावर (Airport) उभे आहे. त्याच्या खाली एक मारुती कार उभी आहे.' हे गो ग्राउंड मारुती वाहन असल्याचे सांगितले जात आहे.

airplanes
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये या पदांसाठी नोकरीच्या संधी

दुसरीकडे, ही कार विमानतळावर भरधान वेगाने आली आणि थेट इंडिगोच्या (Indigo) विमानाखाली येऊन थांबली, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही कार विमानाला धडकली नाही अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. हे विमान दिल्लीहून पाटण्याला जाणार होते. मात्र त्यापूर्वीच ही मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या चाकांना धडकून कारही वाचली. विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. काही वेळातच हे विमान पटनासाठी उड्डाण करणार असताना ही घटना घडली. विमानाच्या चाकांवर कार आदळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com