तिजंदर बग्गा यांच्या समर्थनार्थ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खुली धमकी देणाऱ्या तिजंदर बग्गा यांच्या या प्रकरणात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उडी घेतली आहे.
तिजंदर बग्गा यांच्या समर्थनार्थ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
CM Pramod SawantANI

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून अनेकविध मुद्यावरुन गाजत आहे. एकीकडे सामन्या नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना खुली धमकी देणाऱ्या तिजंदर बग्गा भोवती दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमधील राजकारण फेर धरत आहे. यातच आता या प्रकरणात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी उडी घेतली आहे. (Goa Chief Minister Pramod Sawant in support of Tajinder Bagga)

CM Pramod Sawant
Mahabharat Katha: पांडवांचा अज्ञातवास; शापामुळं अर्जुनानं 'या' रुपात व्यतीत केलं जीवन

मी येथे युवा मोर्चाचा अध्यक्ष आणि माझा भाऊ तजिंदर सिंग बग्गा (Tajinder Singh Bagga) यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी स्वत: BJYM चा उपाध्यक्ष होतो. माझा भाऊ बग्गा याने नुकतेच एक ट्विट केले होते पण AAP चे केजरीवाल जी यांनी पंजाब पोलिसांमार्फत बग्गावर गुन्हा नोंदवला, आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांना न कळवता बग्गाचे अपहरण केले, मी याला अपहरणच म्हणेन. बग्गाच्या वडिलांना जशी वागणूक मिळाली, पोलिसांनी तशी वागणूक बग्गाला देऊ नये. मी केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असं यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोव्याने 'आप'ला त्यांची जागा दाखवून दिली आहे. अन्यायाविरुद्ध दिल्लीही उभी राहील आणि गोव्यात जे काही झाले ते दिल्लीत ही होईल. त्याचबरोबर पंजाब पोलिसांचा राजकीय वापर केला जात आहे. गोव्यात 'आप' कधीच सत्तेवर येणार नाही आणि दिल्लीची जनताही तेच सांगेल असंही यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.