बुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा पर्यटनास सर्वाधिक पसंती

बुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा पर्यटनास सर्वाधिक पसंती
BookingCom Goa The Most Preferred Destination by Tourist in India and World

नवी दिल्ली: सध्या देशात कोरोना केस वाढत आहे. गेल्या एक वर्षापासून लोकं बाहेर फिरायला जाण टाळत असले तरी, ते घरात कंटाळले आहे, असे दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे, कुटूंबासोबत वेळ घालविणे प्रत्येकाला आवडते. पण अशातच वाढत असलेला कोरोना मात्र पर्यटकांचे प्लॅनिंग बिघडवितांना दिसत आहे.

अशा परिस्थितीत प्रवास करणे योग्य नसू शकतो, परंतु बुकिंग डॉट कॉमच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की प्रवासी येणाऱ्या पूर्ण सप्ताहांत देशात प्रवास करण्याची योजना आखत आहेत. बुकिंग डॉट कॉमने आज होळी आणि इस्टर सुट्टी साजरा करण्यासाठी 27 मार्च 2021 ते 4 एप्रिल 2021 पर्यंत भारतीय प्रवाश्यांनी आरक्षित केलेली  ठिकाणे व निवास प्रकार यादी जाहीर केली आहे.

सर्वात जास्त बुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा राज्य उदयास आले आहे. पर्यटकांनी गोवा राज्यास पसंत केले आहे. गोव्यात सध्या शिमगोत्वाची धुम आहे. आणि त्यातच आज मुख्यमंत्री प्रमोद सांवत यानी गोवा राज्यात पर्यटकांचे स्वागत केले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर आणि शिमगोत्सवाच्या मुहुर्तावर राज्य सरकारने मोठा निर्णय दिला आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोणतेही निर्बंध नाही परंतु सरकारने जाहीर केलेल्या कोरोना त्रिसुत्री नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

तेव्हा सर्वप्रथम गोव्याकडे पर्यटकांचा कौल आहे तर, नवी दिल्ली आणि जयपूर या काळात सर्वाधिक बुकींग झालेल्या पहिल्या स्थानांपैकी एक आहेत. बुकिंग डॉट कॉमने स्थानिक प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाश्यांनी आरंभित निवास प्रकारांची घोषणा केली असून यातून असे दिसून आले आहे की प्रवासी हॉटेल व्यतिरिक्त राहण्यासाठी रिसॉर्ट्स, गेस्टहाउस आणि होमस्टेज सारखे पर्याय निवडत आहेत.

“2020 हे आपल्या सर्वांसाठी प्रवास करण्यासाठी अवघड होते, परंतु भविष्यासाठी प्रवास करता येण्याची आशा आहे. प्रवासी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशभरातील आमच्या व्यासपीठावर प्रवासाची योजना बनवतात. शनिवार व रविवारचा अधिकाधिक फायदा घेण्याबाबत ते आशावादी आहे. महामारीच्या काळात प्रवाशांच्या मागण्यांचे समर्थन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यांना योग्य किंमतीत चांगले ठिकाण, आणि उत्तम सोय उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत," असे बुकिंग डॉट कॉम दक्षिण आशियाच्या रीजनल मॅनेजर रितू मेहरोत्रा म्हणाल्या.

27 मार्च 2021 ते 4 एप्रिल 2021 या कालावधीत भारतीय प्रवाश्यांनी या ठिकाणांची नोंद केली आहे

 • गोवा
 • नवी दिल्ली
 • जयपूर
 • ऋषिकेश
 • मुंबई
 • दार्जिलिंग 
 • पुरी
 • उदयपूर
 • बेंगलुरू
 • मनाली

हॉली आणि रिसॉर्टमध्ये प्रवाश्यांना कंफर्ट मिळाल्याने  त्यांनी यंदा होळी आणि इस्टर दरम्यान बुकिंग केले आणि त्यानंतर गेस्ट हाऊस, वसतिगृहे आणि होमस्टेस या पर्यायी सुविधांची वाढती लोकप्रियता दिसून आली आहे.

 • हॉटेल
 • रिसॉर्ट
 • गेस्ट हाऊस
 • वसतिगृहात
 • होमस्टेस

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com