दिल्लीत होणाऱ्या व्यापार मेळाव्यात गोव्याचाही सहभाग

गोव्यातील कारागीर मेळ्यात भाग घेतील आणि उत्पादनांचे प्रदर्शन मांडतील.
दिल्लीत होणाऱ्या व्यापार मेळाव्यात गोव्याचाही सहभाग
Goa participates in trade fair to be held in DelhiDainik Gomantak

पणजी: नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आजपासून 27 नोव्हेंबर 2021 पर्यंत आयोजित केलेल्या 40व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात गोवा राज्य सहभागी होणार आहे. भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेद्वारे आयोजित वार्षिक कार्यक्रमात माहिती आणि प्रसिध्दी खाते नोडल एजन्सी आहे. हा प्रतिष्ठित व्यापार मेळा दक्षिण-आशिया प्रदेशातील बहुप्रतिक्षित व्यावसायिक कार्यक्रमांपैकी एक असून कोविड महामारीमुळे गेल्या वर्षी आयोजित केला नव्हता. दरवर्षी आयोजित केलेल्या या मेळाव्याला दिल्ली आणि देशभरातून असंख्य लोकांची उपस्थिती असते.

या वर्षाची मेळाव्याची संकल्पना ‘आत्मनिर्भर भारत’, नवीन भारताची दृष्टी अशी आहे. माहिती खात्याव्यतिरिक्त पर्यटन विभाग, हस्तकला विभाग, वस्त्रोद्योग आणि कॉयर विभाग, उद्योग व्यापार आणि वाणिज्य संचालनालय, गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि गोवा गुंतवणूक प्रोत्साहन सुविधा मंडळ अशी पाच खाती या मेळ्यात सहभागी होतील.

Goa participates in trade fair to be held in Delhi
देव दीपावली

प्रगती मैदानावर हॉल क्रमांक ३ एफ बेअर स्पेसमध्ये 60 चौरस मीटर क्षेत्रफळावर गोवा मंडप उभारण्यात येईल. प्रगती मैदानावर उभारण्यात येणाऱ्या गोव्याच्या दालनात गोव्याची प्रगती, गोव्यात गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या साधनसुविधा, पर्यटन, गोव्याची उच्च पाककृती, आदरातिथ्य, कला- संस्कृती आणि इतर सुविधांवर प्रदर्शन मांडण्यात येईल. तसेच दालनाला भेट देणाऱ्या लोकांना गोव्याच्या माहितीवरील पुस्तिका वितरीत करण्यात येईल.

Goa participates in trade fair to be held in Delhi
गोव्याच्या किनाऱ्यावरील अवैध कृत्यांवर आळा घाला

गोव्यातील कारागीर मेळ्यात भाग घेतील आणि उत्पादनांचे प्रदर्शन मांडतील. प्रगती मैदानावर नवीन प्रदर्शन तथा संमेलन केंद्र समाविष्ट केल्यामुळे मेळाव्याचे क्षेत्रफळ अंदाजे 73 हजार चौरस मीटर इतके वाढले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com