भारतात टेलिमेडिसिनला आले चांगले दिवस

भारतात टेलिमेडिसिनला आले चांगले दिवस
भारतात टेलिमेडिसिनला आले चांगले दिवस

मुंबई: कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी जवळपास ७० टक्के रुग्णांनी डॉक्‍टरांकडून ऑनलाइन सल्ला घेणे पसंत केले आहे. भारतात टेलिमेडिसिनलाही चांगले दिवस आले आहेत, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मॅनकाईंड फार्माच्या सहकार्याने डॉ. ओ. एन. ए. हेल्थने केलेल्या सर्वेक्षणानुसार ६० टक्के रुग्णांनी ऑनलाइन सल्ला घेऊन समाधान व्यक्त केले. ५४ जणांनी भविष्यातही हे सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वेक्षणात २५० पेक्षा जास्त शहरांत वेगवेगळ्या वयोगटातील तीन हजार पेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, टेलिमेडिसिन भारतीय आरोग्य सेवेचा अविभाज्य भाग होऊ शकते, असे यातून दिसले आले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com