Good News: कोरोना लसीच्या किंमतीत घट: सर्वसामान्यांसाठी इतक्या होणार रूपयात उपलब्ध
Good News Corona vaccine prices have Decreased

Good News: कोरोना लसीच्या किंमतीत घट: सर्वसामान्यांसाठी इतक्या होणार रूपयात उपलब्ध

नवी दिल्ली: देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. दरम्यान, लसीच्या किंमतीबाबत आरोग्य मंत्रालयाने एक नवीन खुलासा केला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, लसांच्या किंमतींवर पुन्हा निर्मात्याशी चर्चा करण्यात आली आहे. लसची किंमत आता 200 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. कोविशिल्ट लसीची किंमत आता प्रति डोस 200 रुपयांपेक्षा कमी असणार असे पत्रकार परिषदेत केंद्रीय सचिव म्हणाले.

आतापर्यंत खासगी रूग्णालयात लसीच्या एका डोसची किंमत 250 रुपये आहे. यामध्ये, 150 रुपये लस डोसची किंमत तर 100 रुपये सेवा शुल्क आकारले जात आहे. लसची किमती कमी होण्यामागील कारण लसीचे उत्पादन वाढवल्याचे सांगितले जात आहे. भारताची लस याक्षणी जगातील सर्वात स्वस्त लस आहे, तर चिनची लस जगातील सर्वात महाग लस आहे. भारताच्या तुलनेत चीनची लस जवळपास 9 पटीने महाग आहे.

देशात 2.60 कोटींची लस देण्यात आली आहे

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाशिवरात्रीमुळे गुरुवारी कमी लोक लस घेण्यासाठी आले होते. सायंकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 3,89,337 लोकांना लसीला डोस देण्यात आला. देशामध्ये आतापर्यंत 2.60 कोटी पेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या मते गुरुवारी संध्याकाळी सात पर्यंत कोविड -19 लसीचे एकूण 2,60,73,517  डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 72,16,759 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम डोस देण्यात आला, तर 40,48,754 लोकांना दुसरा डोस देण्यात आला. 71,16,849 कर्मचार्‍यांना प्रथम डोस आणि 6,70,813 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेमध्ये 59,98,754 ज्येष्ठ नागरिकांना आणि विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 10,21,588 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com