कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! फक्त चारच दिवस कामाला जावं लागण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

कर्मचाऱ्यांना लवकरच एक खूशखबर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: कर्मचाऱ्यांना लवकरच एक खूशखबर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाला अधिकृतरित्या अंमलात आणण्यासाठी सरकारकडून अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

असे असणार कामाचे तास

या नव्या कायद्यानुसार सरकारने आठवड्याच्या 4 दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना दर दिवसाला 12 तास काम करावे लागणार असून एका आठवड्यात काम करण्याची मर्यादा 48 तासांची असणार आहे. त्यामुळे दर दिवसाला 12 तास काम केल्यास आणि 4 दिवस काम करून कर्मचाऱ्यांना 3 दिवस सुट्टी देता येऊ शकते.

कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक

या निर्णय अधिकृतरित्या लागू करण्यासाठी कंपनी आणि कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक असणार आहे. कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला सहमती दिली तरच हा निर्णय अंमलात येवू शकतो. दरम्यान, 1 एप्रिल 2021 पासून हा कायदा आणि आणखी नवीन 4 कामगार कायदे लागू होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. हे कायदे अंमलात आल्यानंतर देशात कामगार धोरणाच्या नव्या कार्य प्रणालीला सुरूवात होणार आहे.

अहो आश्चर्य ! गोव्यात खरंच सापडलं दगडाचं हृदय -

कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार

त्याचबरोबर एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता सुध्दा वर्तविली जात आहे. नवीन कामगार विधेयकांत बदल झाल्यामुळे हे बजल घडणार अशी शक्यता आहे. याच बदलानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात, पीएफ नियमात सरकारकडून बदल करण्यात  आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जाते आहे मात्र हातात येणारा आता हातात येणारा पैसा म्हणजे टेक होम सॅलरी कमी होणार आहे ही बाब कर्मचाऱ्यांसाठी काळजीचं कारण ठरणार आहे.

Delhi Tractor Parade Violence : लाल किल्ला हिंसाचाराचा आरोपी दीप सिद्धूला अटक -

संबंधित बातम्या