खूशखबर! मराठीसह आठ भारतीय भाषांतून इंजिनियरिंगचं शिक्षण घेता येणार

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 मे 2021

या निर्णयामुळे आदीवासी तसेच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगच्या शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अर्थात (AICTE) आता महाविद्यालयांना आठ भाषामधून इंजिनियरिंगचं (Engineering) शिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह (Marathi) तेलगू, कन्नड, बंगाली, तमिळ, गुजराती, आणि मल्याळम या आठ भारतीय भाषामधून अभियांत्रीकीचं शिक्षण घेता येणार आहे. या निर्णयामुळे आदीवासी (Tribal) तसेच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगच्या शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

आत्तापर्यंत अनेक हुशार विद्यार्थी इंग्रजीच्या भितीने अभियांत्रकीच्या शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. रशिया. जर्मनी, जपान, चीन अशा देशांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषांमधून शिक्षण दिलं जातं. (Good news Engineering can be studied in eight Indian languages ​​including Marathi)

गूगलवर सर्च केलेली माहिती खरी की खोटी ?  गूगलचे अनोखे फीचर 

AICTE चे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुध्दे (Anil Sahasrabudhe) म्हणाले की, विद्यार्थ्यांना जर त्यांच्या मातृभाषेतून इंजिनियरिंगचं शिक्षण घेता आलं तर त्यांचा पाया मजबूत होण्यास आणखी मदत होईल. आम्हाला पूर्ण देशांमधून 500 अर्ज आले आहेत. येणाऱ्या काळात अभियांत्रीकीचं पदव्युत्तर शिक्षण आणखी 11 भाषांमधून देण्यासंदर्भात नियोजन करत आहोत.

तसेच AICTE या सर्व कोर्सच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके, नोट्स हे सर्व काही स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्वयम आणि MOOC या पोर्टल्सवरंच साहित्यही या भाषांमध्ये भाषांतरीत केलं असल्याचं यावेळी सहस्त्रबुध्दे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या