शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! यंदा शत:प्रतिशत मॉन्सून

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख मृत्यूंजय महामात्रा यांनी मान्सूच्या दुसऱ्या टप्प्याचा दिर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे देशभरातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांसाठी (farmers) समाधानाची बाब आहे.

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख मृत्यूंजय महामात्रा (Mrityunjaya Mahamatra) यांनी मॉन्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या टप्प्याचा दिर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. 16 एप्रिल रोजी हवामान विभागाने जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये देशभरात 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 1961 ते 2010 या कालावधीमध्ये मॉन्सून पावसाची सरासरी 88 सेंटीमीटर अर्थात 880 मिलिमीटर आहे, तर एकूण सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

मॉन्सून हंगामातील पावसाचा अंदाज स्टॅटेस्टिकल एनसेंबल फोरकास्टींग सिस्टीम मॉडेलच्या (Statistical Ensemble Forecasting System Model) आधारे नोंदवला जातो. पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. आयएमडीच्या मल्टीमॉडेल एन्सेंबल फोरकास्टींग पध्दतीनुसार यावर्षी सरासरी इतक्या 96 ते 104 पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मॉन्सूनच्या गतीला थोडासा ब्रेक, 3 जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता

पॅसिफिक महासागरातील (Pacific Ocean) समुद्र पृष्ठभागात सर्व सामान्य एल निनो (El Niño) स्थिती आहे. मान्सून मॉडेल आणि जगातील इतर मॉडेलनुसार मान्सून हंगामात ही स्थिती स्थीर राहणार आहे. यातच आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधील तापमानाचा फरक सध्या सामान्य आहे. मान्सून काळातही ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आली आहे.

यंदा प्रथमच भारतीय हवामान विभागाने जून महिन्यात अंदाज जाहीर केला आहे. जून महिन्यामध्ये मॉन्सूनच्या आगमानाचा कालावधी असल्याने हवामानात प्रचंड वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावरही बराच मोठा परिणाम होतो. यावर्षी जून महिन्यात देशात 92 ते 108 टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. महाराष्ट्राचा विचार करता जून महिन्यात मराठवाड्यात एकूण सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोकण आणि विदर्भात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यत आहे.

Cyclone Yaas: उंच लाटा, वादळी वारा, चक्रीवादळाचे रौद्र रूप व्हिडीओतून आले समोर

दरम्यान, मध्य भारतात 106 टक्के पावसाचा अंदाज असल्याने महाराष्ट्रामध्येही चांगला पाऊस पडेल. मान्सून काळात मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, उत्तर माहाराष्ट्रत सरासरीपेक्षा पावसाची शक्यता नकाशाच्या आधारे स्पष्ट हो त आहे.

संबंधित बातम्या