खुशखबर! उद्यापासून भारतीय रेल्वे सुरू करणार या 11 स्पेशल ट्रेन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या आता धावत आहेत,. भारतीय रेल्वे आता विशेष गाड्या हळू हळू चालू झाल्या आहेत. आता पश्चिम रेल्वेने 11 नवीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या आता धावत आहेत,. भारतीय रेल्वे आता विशेष गाड्या हळू हळू चालू झाल्या आहेत. आता पश्चिम रेल्वेने 11 नवीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या लवकरच सुरू केल्या जातील. परंतु प्रवाशांनाही कोरोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल, असे ट्विट करत पश्चिम रेल्वेने ट्विटमध्ये रेल्वेने स्पष्ट केले हे. चला तर या 11 खास गाड्या कोणत्या आहेत हे आता जाणून घेऊया...

1. 09009/09010 मुंबई सेंट्रल नवी दिल्ली दुरंतो सुपरफास्ट स्पेशल

ही ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. 09009 सोमवारी आणि शुक्रवार रात्री 11 वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटणार. ही ट्रेन 25 फेब्रुवारीला मुंबईहून सुटेल आणि 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 4.45 वाजता नवी दिल्ली येथे पोहोचेल. नवी दिल्ली येथून दर मंगळवार आणि शनिवारी रात्री 10: 10 वाजता सुटेल ही ट्रेन 26 फेब्रुवारीला नवी दिल्लीहून सुटेल आणि 27 फेब्रुवारीला सायंकाळी 3 वाजून 35 मिनिटांनी मुंबईला पोहोचेल. ही ट्रेन वडोदरा, रतलाम आणि कोटा येथे थांबेल.

राजस्थान फिरायचंय? मग भारतीय रेल्वेच्या या पॅकेजेसचा नक्की विचार करा

2. 09289/09290 वांद्रे टर्मिनस-महुवा सुपरफास्ट स्पेशल

09289 वांद्रे दर शुक्रवारी संध्याकाळी 4.45 वाजता सुटेल. ही ट्रेन सुद्धा 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. ही ट्रेन 26 फेब्रुवारी रोजी सकाळी .4..45 वाजता महुवा येथे पोहोचेल. ही महुवा येथून सायंकाळी 7.20 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता वांद्रेला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरगम, सुरेंद्रनगर, बोटाड, ढोला, धसा, लिलिया मोटा, सावरकुंडला आणि राजुला स्थानकांवर थांबेल.

3. 09293/09294 वांद्रे टर्मिनस-महुवा सुपरफास्ट स्पेशल

09293 ही ट्रेन दर बुधवारी संध्याकाळी 4.45 वाजता वांद्रे येथून सुटेल. याची सुरुवात 2 मार्चपासून होणार आहे. 3 मार्च रोजी सकाळी 4..45 वाजता महुवा येथे पोहोचेल. ही ट्रेन महुवा येथून सायंकाळी 7.20 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता वांद्रेला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरगम, सुरेंद्रनगर, बोटाड, ढोला, धसा, लिलिया मोटा, सावरकुंडला आणि राजुला स्थानकांवर थांबेल.

4. 09336/09335 इंदूर-गांधीधाम सुपरफास्ट स्पेशल

ही ट्रेन 27 फेब्रुवारीपासून धावणार आहे. 09336 क्रमांक असलेली ही ट्रेन दर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता इंदोरहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी अडीच वाजता गांधीधामला पोहोचेल. ही गाडी गांधीधामहून दर सोमवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 8. 55 मिनिटाला इंदूरला पोहोचेल. ही ट्रेन देवास, उज्जैन, रतलाम, दाहोद, गोधरा, अहमदाबाद आणि विरमगाम येथे थांबेल.

गोवा पर्यटकांसाठी खुशखबर! IRCTC ने दिले “EXOTIC GOA” टूर पॅकेज

5. 09507/09506 इंदूर-उज्जैन स्पेशल (डेली)

ही ट्रेन 1 मार्चपासून धावणार आहे. 09507 इंदूरहून दररोज संध्याकाळी 6 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8. 05ला उज्जैनला पोहोचेल. परत येतांना सकाळी 8 वाजता उज्जैनहून सुटेल आणि सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी इंदूरला पोहोचेल. ही गाडी लक्ष्मीबाई नगर, मंगलिया व्हिलेज, बरलाई, देवास आदी स्थानकांवर थांबेल.

6. 09518/09517 उज्जैन-नागदा स्पेशल (डेली)

ही ट्रेन 2 मार्चपासून धावणार आहे. 09518 क्रमांकाची ही ट्रेन सकाळी 7 वाजता उज्जैनहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी .8 वाजून 25 मिनिटांनी नागदा येथे पोहोचेल. परत येतांना नागदाहून सायंकाळी 6 वाजता सुटेल आणि सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी उज्जैनला पोहोचेल. जाताना नायकेरी, अस्लोदा, पलसोरा मकरवा, उन्हेल, पिपलोदा बागला आणि भातिसुदा या स्थानकावर थांबणार आहे.

7. 09554/09553 उज्जैन-नागदा स्पेशल (डेली)

ही ट्रेन 1 मार्चपासून धावणार आहे. 09554 उज्जैन येथून रात्री 8.40 वाजता सुटेल आणि रात्री 10.10 मिनिटांनी नागदा येथे पोहोचेल. परत येतांना रात्री नागदाहून 11 वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी वाजता उज्जैनला पोहोचेल. जाताना नायकेरी, अस्लोदा, पलसोरा मकरवा, उन्हेल, पिपलोदा बागला आणि भातिसुदा येथे थांबा.

8. 09341/09342 नागदा-बीना स्पेशल (डेली)

ही ट्रेन 2 मार्चपासून धावणार आहे. 09341 सकाळी 11:10 वाजता नागदाहून सुटेल आणि सकाळी 10 वाजता बीनाला पोहोचेल. ही बिना येथून सकाळी 7 वाजता सुटेल आणि सायंकाळी साडेपाच वाजता नागदा येथे पोहोचेल.

9. 09545/09546 रतलाम-नागदा स्पेशल (डेली)

ही ट्रेन देखील 2 मार्चपासून धावणार आहे. ही ट्रेन सकाळी दहा वाजता रतलाम येथून सुटेल आणि सकाळी अकरा वाजता नागदाला पोहोचेल. दररोज नागदा येथून सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि  सकाळी साडे नऊ वाजता रतलामला पोहोचेल. ही गाडी बांगरोड, रूपखेडा, खाचरोड आणि बेरावण्यात थांबेल.

10. 09528/09527 भावनगर टर्मिनस-सुरेंद्रनगर स्पेशल (डेली)

ही ट्रेन 1 मार्चपासून धावणार आहे. 09528 सकाळी 5 वाजता भावनगरहून सुटून सकाळी 9 वाजता सुरेंद्रनगरला पोहोचेल. रत येतांना सुरेंद्रनगर येथून सायंकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि रात्री 11 वाजता भावनगरला पोहोचेल.

11. 09534/09533 भावनगर टर्मिनस-सुरेंद्रनगर स्पेशल (डेली)

ही ट्रेन 1 मार्चपासून धावणार आहे. ही ट्रेन दररोज दुपारी अडीच वाजता भावनगरहून सुटेल आणि सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी सुरेंद्रनगरला पोहोचेल. हीच ट्रेन सुरेंद्रनगर येथून सकाळी 9.40 ला सुटेल आणि दुपारी दीड वाजता भावनगरला पोहोचेल. 

महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक 

 

 

संबंधित बातम्या