फेसबुकनंतर भारतात 'गुगल'ची Gmail सेवा 'डाऊन'

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या Google ची Gmail सेवा भारतामध्ये डाऊन झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
फेसबुकनंतर भारतात 'गुगल'ची Gmail सेवा 'डाऊन'
Gmail Dainik Gomantak

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या Google ची Gmail सेवा भारतामध्ये डाऊन झाली असल्याची माहिती समोर आली आहे. देशात काही ठिकाणी जीमेल सेवा वापरताना काही तांत्रिक अडचणींचा यूजर्सना सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वापरकर्त्यांना जीमेलवरुन कोणताही प्रकारचा मेल पाठवता येत नाही. यासोबतच मेल इनबॉक्समध्ये येत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. भारतामध्ये (India) जीमेल सेवेचा सर्वाधिक वापर केला जात आहे. त्याचबरोबर खासगी कामांपासून ते सार्वजनिक कार्यालयीन कामापर्यंत Gmail चा वापर करण्यात येतो. भारताला जीमेल सेवा डाऊन झाल्यामुळे मोठा फटका बसला आहे.

Down Detector या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 68 टक्के वापरकर्त्यांना जीमेल सेवेचा वापर करताना तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. देशात जवळपास 18 टक्के यूजर्संना जीमेल डाऊन झाल्याती तक्रार दिली आहे. तर 14 टक्के यूजर्संना जीमेल लॉगइन करताना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला आहे.

 Gmail
फेसबुक, इन्स्टासह व्हॉट्सअॅप थॉमस नावाच्या हॅकरने केलं होतं ठप्प

तसेच, देशात वापरकर्त्यांनी जीमेल सेवा डाऊन झाल्याची माहिती समाजमाध्यमातून देत आहेत. दरम्यान गुगुलकडून जीमेल डाऊन झाले असल्याचे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com