बिहारमधील सरकार अहंकारी : सोनिया

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

बिहारमधील नितीशकुमार सरकारला ‘अहंकारी आणि पथभ्रष्ट’ अशा खरमरीत शब्दांत संबोधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बिहारी जनतेला सत्तापरिवर्तनासाठी साद घातली. तसेच राजद-काँग्रेसच्या महाआघाडीला जनतेचा पूर्ण पाठींबा असल्याचा दावाही सोनियांनी केला. मतदारांना आवाहन करणारा सोनिया यांचा व्हिडीओ जारी करण्यात आला.

नवी दिल्ली : बिहारमधील नितीशकुमार सरकारला ‘अहंकारी आणि पथभ्रष्ट’ अशा खरमरीत शब्दांत संबोधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बिहारी जनतेला सत्तापरिवर्तनासाठी साद घातली. तसेच राजद-काँग्रेसच्या महाआघाडीला जनतेचा पूर्ण पाठींबा असल्याचा दावाही सोनियांनी केला. मतदारांना आवाहन करणारा सोनिया यांचा व्हिडीओ जारी करण्यात आला.

‘बिहारमधील सरकार सत्तेच्या अहंकारामुळे पथभ्रष्ट झाले आहे. या सरकारची कथनी चांगली नाही आणि करणीही चांगली नाही. मजूर, शेतकरी, तरुण निराश असून शेतकऱ्यांवरील संकट गंभीर आहे. दलित आणि महादलितांना दुरवस्थेच्या काठावर नेण्यात आले आहे. मागासवर्गीय या वाईट परिस्थितीचे शिकार झाले आहेत,’ असे टिकास्त्र सोनिया गांधींनी सोडले आहे. 

"नवनिर्माणाची क्षमता असूनही बेरोजगारी, स्थलांतर, महागाई, उपासमारीमुळे बिहारच्या डोळ्यात अश्रू आणि पायांवर फोड आहेत. भीती, दहशत, अपराध या पायावर धोरण आणि सरकार उभे राहू शकत नाही."
- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष

संबंधित बातम्या