सरकार कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज बांधण्यात अपयशी! 

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

जनहितासाठी मोफत लसीकरणाची घोषणा करणं हे आवश्यक होतं.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरत होती तेव्हा  कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असा अनेकांना वाटलं. कोरोनाचं समूळ उच्चाटन होण्यास सुरुवात झाली असं देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी (Health Minister) म्हटलं होतं. एकूणच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि त्याच्या परिणामाबाबत अंदाज बांधण्यात सरकार अपयशी ठरले, अशी परखड टीका नोबेलविजेते प्रख्यात अर्थशात्री डॉ. अभिजीत बॅनर्जी (Abhijit Banerjee) यांनी केली आहे.

बॅनर्जी यांनी माध्य़माला दिलेल्या मुलाखतीमध्ये, कोरोना, टाळेबंदी, पश्चिम बंगालची निवडणूक आदी विषयांवर आपली परखड मते मांडली. केंद्र सरकारने कोरोना लसींची आयात करुन जनहितासाठी मोफत लसीकरणाची घोषणा करणं हे आवश्यक होतं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत...

टाळेबंदी तीन महिने किंवा अगदीच सहा महिने लागू करता येत नाही. अतिबाधित ठिकाणी टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात यावा. तीन आठवड्यांसाठी टाळेबंदी पुरेशी असल्याचं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. तसेच टाळेबंदीचा फटका आर्थिक दुर्बल घटकांना बसतो. त्यामुळे टाळेबंदीच्या दरम्यान सरकारनं गरिबांना अर्थसहाय्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आठ टप्प्याऐवजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूका झाल्या असत्या तर उत्तम झाले असते. नेत्यांच्या सततच्या प्रचारसभांमुळे कोरोना नियमांचं उल्लंघन झालं, असं निरिक्षण बॅनर्जी यांनी नोंदवलं. बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमुल स्वीकारार्ह असल्याचा जनतेनं कौल दिला. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराची जुनी पंरपरा आहे. डावे, कॉंग्रेस आणि तृणमुल आदी पक्ष त्यास सारखेच जबाबदार आहेत, असेही यावेळी बॅनर्जी यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या