भारत सरकारच्या 'या' निर्णयाचा ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही होणार फायदा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

आता देशात 1 एप्रिलपासून मोटारींच्या पुढील सीटसीठी एअरबॅग आवश्यक आहेत. परिवहन मंत्रालयाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे. 

नवी दिल्ली: आता देशात 1 एप्रिलपासून मोटारींच्या पुढील सीटसीठी एअरबॅग आवश्यक आहेत. परिवहन मंत्रालयाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे.  केंद्र सरकारने वाहनांच्या पुढील सीटवर प्रवाश्यांसाठी एअरबॅग अनिवार्य केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काल शुक्रवारी सांगितले की एअरबॅगच्या अनिवार्य तरतूदीबाबत राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

आता कंपन्यांना 1 एप्रिलपासून पुढच्या सीटसाठी (ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारील सीट) नवीन कारमध्ये एअरबॅग बसवावे लागतील. भारत सरकार बऱ्याच काळापासून कारमधील सीटवर फ्रंट एअरबॅग बनविण्यावर काम करत होती. परिवहन मंत्रालयाने कायदा मंत्रालयाचा असाच एक प्रस्ताव पाठविला होता, जो आता मंजूर झाला आहे. वाहनांमध्ये ड्रायव्हरच्या सीटसमोर बसलेल्या प्रवाश्यांना एअरबॅग अनिवार्य करण्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा एक महत्वाचा सुरक्षा उपाय आहे. रस्ता सुरक्षाविषयक सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने त्याबाबत सूचना केली होती.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या प्रसिद्ध 'संदेश मिठाई'ला देखील चढला राजकिय रंग

जुन्या वाहनांच्या संदर्भात, 31 ऑगस्ट 2021 पासून अनिवार्य करण्यात आले आहे, सध्याच्या मॉडेल्समध्ये पुढील ड्रायव्हरच्या आसनासह पुढच्या सीटवर एअरबॅग बसविणे गरजेचे असणार आहे.  एअरबॅग असतांना अपघात झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री होईल. असा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

Infosys, Accenture बरोबरच Capgemini देखील कर्मचाऱ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा खर्च उचलणार

एअर बॅग उत्पादकांचा फायदा

सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा एअरबॅग बनविणार्‍या कंपन्यांना होणार आहे. राणे मद्रास कंपनी ही भारतातील सर्वात मोठी भारतीय एअरबॅग उत्पादक कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय कंपनी बॉशदेखील मोठ्या प्रमाणात एअरबॅग तयार करते. सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा या कंपन्यांना होणार आहे. 

संबंधित बातम्या