नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी होणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती इथून पुढे प्रत्येक वर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली :  भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती इथून पुढे प्रत्येक वर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. "नेताजी हे भारताचे स्वतंत्र्यसेनानी होते. आम्ही या घोषणेचे स्वागत करतो पण लोक 23 जानेवारीला 'देशप्रेम दिवा' म्हणून साजरे करत आहेत, जर सरकारने ते देशप्रेम दिवस म्हणून जाहीर केलं असतं तर अधिक योग्य ठरलं असतं, परंतु आम्ही या घोषणेबद्दल आनंदी आहोत”, अशी प्रतिक्रिया नेताजी सुभाष चंद्र यांचे पणतू आणि भाजपचे नेते सी के बोस यांनी दिली.  

CBSE दहावी - बारावीच्या परिक्षांबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेली ही समिती  23 जानेवारी 2021 पासून सुरू होणाऱ्या या निर्णय घेणार आहे. समितीच्या सदस्यांमध्ये तज्ज्ञ, इतिहासकार, लेखक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबीय तसेच आझाद हिंद फौज-आयएनएशी संबंधित नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. 

सुरतमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 15 कामगारांना ट्रकने चिरडलं; 13 जणंचा मृत्यू 

ही समिती दिल्ली, कोलकाता आणि नेताजी आझाद हिंद फौजशी संबंधित इतर ठिकाणी तसेच परदेशातही स्मारक उपक्रमांना मार्गदर्शन करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की नेताजी सुभाष बोस यांचे शौर्य सर्वश्रुत आहे. ते म्हणाले, एक विद्वान, सैनिक आणि राजकारणी सर्वांत उत्कृष्ट, आम्ही लवकरच त्यांच्या 125 व्या जयंती उत्सवाला सुरवात करणार आहोत. हा विशेष कार्यक्रम भव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वांना आवाहन केले.

संबंधित बातम्या